संजय राऊत आणि सपना पाटकर यांच्या संवादाची एक ऑडियो क्लिप व्हायरल झाली होती. पण यात संवाद कमी आणि आक्षेपार्ह भाषा, शिव्याचं जास्त होत्या. क्लिप व्हायरल झाल्यावर संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सर्व स्तरावरून संजय राऊत यांच्यावर टीकाही करण्यात आली. पण या सगळ्यात राज्य महिला आयोगाचं तोंड बंद आहे. त्यांच्या या भूमिकेमुळेच आता महिला आयोगावर टीका होऊ लागली आहे.