31 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरक्राईमनामा'मासिक पाळी' प्रकरणातील मुलीनेच रचला होता बनाव!

‘मासिक पाळी’ प्रकरणातील मुलीनेच रचला होता बनाव!

Google News Follow

Related

नाशिकमधील मासिक पाळी प्रकरणाने वेगळेच वळण घेतलं आहे. मासिक पाळी सुरु असल्यामुळे एका विद्यार्थिनीला वृक्षारोपण करण्यास शिक्षकाने मनाई केल्याचे विद्यार्थिनीने सांगितले होते. याविषयी संबंधित विद्यार्थिनीने आधी पालकांकडे आणि नंतर आयुक्तांकडे याविषयी तक्रार केली होती. मुलीच्या तक्रारीनंतर या विषयी राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मात्र, चौकशीनंतर समितीने सादर केलेल्या अहवालात ही तक्रार बनावट असल्याचं उघड झालं आहे. सदर विद्यार्थिनी आदिवासी विभागात काम करणाऱ्या एका राजकीय पक्ष संघटनेची सदस्य आहे.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव शासकीय आश्रमशाळेत गेल्या आठवड्यात विद्यार्थिनीला मासिक पाळीत वृक्षारोपण करण्यास मनाई करण्यात आली होती. विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार आयुक्तांनी समिती स्थापन केली होती. मात्र, प्रत्यक्षात संबंधित विद्यार्थिनीबाबत असा काही प्रकार घडलाच नसल्याचं चौकशीत आढळून आलं आहे. शाळेत वृक्षारोपण झाले त्या दिवशी संबंधित विद्यार्थिनी गैरहजर असल्याचं समितीने केलेल्या चौकशीत आढळून आलं.

आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी वर्षा मीना आणि बालहक्क संरक्षण आयोगाच्या सायली पालखेडकर यांचा अहवाल समोर आला आहे. त्यामुळे संबंधित शिक्षक निर्दोष असल्याचा अहवाल चौकशी अधिकारी तसेच प्रकल्प अधिकाऱ्यांनी अप्पर आयुक्तांकडे सादर केला आहे. दोन महिन्यांपासून ही विद्यार्थिनी सतत गैरहजर होती. या कारवाईच्या भीतीतून विद्यार्थिनीने आरोप करताना सदर प्रकरणाचा बनाव केला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अहवालानुसार, शाळेचा हजेरी पट तपासला असता, ज्या दिवशी वृक्षारोपण झाले, त्याच दिवशी म्हणजे १४ जुलै रोजी संबंधित विद्यार्थिनी शाळेत गैरहजर होती, असे आढळून आले. तसेच ही विद्यार्थिनी जून महिन्यात चार दिवस तर जुलै महिन्यात फक्त तीन दिवस शाळेत उपस्थित होती, असे चौकशीतून उघड झाले आहे.

हे ही वाचा:

गोव्यातील ‘त्या’ रेस्टॉरंटप्रकरणी स्मृती इराणी, झोईशला क्लीनचीट

अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीला ड्रोनने टिपले

माजी मुख्यमंत्री एन.टी. रामराव यांची मुलगी आढळली मृतावस्थेत

राष्ट्रकुल स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताने कमावली तीन पदकं

सतत गैरहजर असल्यामुळे तिला बारावीचे वर्ष वाया जाण्याची भीती होती. विज्ञान शाखेत शिकत असूनही ती गैरहजर असल्याने वर्गशिक्षकाने तिला जाब विचारला होता. तसेच यापुढे शाळेत बसू न देण्याचाही इशाराही तिला देण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थिनीने कारवाईच्या भीतीपोटी मासिक पाळीमुळे आपल्याला वृक्षारोपणापासून रोखल्याचा बनाव केल्याची शक्यता चौकशी अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा