झारखंडच्या तीन काँग्रेस आमदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांच्यावर काँग्रेसने कारवाईचे पाऊल उचलले.
पश्चिम बंगालमध्ये मोठ्या रकमेसह अटकेत असलेल्या झारखंडच्या तीन आमदारांना काँग्रेसने निलंबित केले आहे. एका गुप्त माहितीवर कारवाई करत, पोलिसांनी ३० जुलै रोजी हावडाच्या रानीहाटी येथील राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करीत असलेले काँग्रेस आमदार इरफान अन्सारी, राजेश कच्छाप आणि नमन बिक्सल कोंगारी यांची कार रोखून झडती घेतली. या झडतीमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणावर रोकड आढळून आली होती.
शनिवारी तीन आमदारांना पकडल्यानंतर काँग्रेसने झारखंडमधील युती सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप केला होता.येथील एआयसीसी मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना पक्षाचे झारखंडचे प्रभारी अविनाश पांडे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तीन आमदारांना तत्काळ प्रभावाने निलंबित केलं असल्याचे सांगितलं.
हे ही वाचा:
शिवीगाळप्रकरणी संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या
आठ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक!
संजय राऊतांच्या घरातून ११.५० लाखांची रोकड जप्त
अॅक्सेल श्वानाने झेलल्या तीन गोळ्या; पण त्याने दहशतवाद्यांना शोधले
तीन आमदारांच्या निलंबनाची घोषणा करताना, झारखंडचे प्रभारी एआयसीसी सदस्य अविनाश पांडे म्हणाले, ह्लबहुतेक आमदार पक्षासोबत आहेत, पण जे आमदार पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे पक्षत त्यांची नेतृत्वाकडे संपूर्ण माहिती आहे. पक्ष योग्य वेळी कारवाई करेल.
५० लाख रूपयांची रोकड मिळाली
रफान अन्सारी यांच्यासह नमद विक्सल कोंगाडी आणि राजेश कश्यप या तीन आमदार एकाच कारमधून पूर्व मिदनापूरच्या दिशेने जात होते. शनिवारी रात्री उशीरा त्यांच्या गाडीची कसून तपासणी करण्यात आली. त्यावेळी या कारमध्ये 50 लाख रुपयांची रोकड आढळून आली होती. ही गाडी कॉंग्रेस आमदार इरफान अन्सारी यांची होती.