शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने रविवार, ३१ जुलै रोजी त्यांच्या निवास्थानावरून ताब्यात घेतलं आहे. नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांना फोर्ट येथील ईडी कार्यालयात नेण्यात येणार असून तिथे अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पथक पोहचले होते.
संजय राऊत यांची गेल्या नऊ तासांपासून ईडीकडून चौकशी सुरु होती. कागदोपत्री कारवाई झाल्यावर संजय राऊत यांना घेऊन ईडीचे पथक त्यांच्या कार्यालयात रवाना होणार असल्याची माहिती आहे. गोरेगाव येथील पत्राचाळा घोटाळाप्रकरणी ही चौकशी सुरु होती. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून राऊतांच्या घरी झाडाझडती सुरु होती तसेच कागदपत्रं आणि दस्ताऐवज ईडीकडून तपासले जात आहेत. याशिवाय राऊत यांच्या दादर इथल्या गार्डन कोर्ट इमारतीमधील फ्लॅटवरही ईडीकडून झाडाझडती सुरु आहे.
हे ही वाचा:
‘संजय राऊतांची जागा नवाब मलिकांच्या शेजारी’
“संजय राऊत यांच्यावर होत असलेल्या कारवाईने आनंद”
“आमची सकाळ खराब करणाऱ्यांची सकाळ खराब होत असताना पाहून समाधान वाटतंय”
ईडीने काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचं अधिवेशन असल्याचं सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. तसेच त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. त्यानंतर आज ईडीचं पथक थेट संजय राऊत यांच्या घरी पोहचलं होतं.