एटीएसने घेतले ताब्यात
देशाविरोधात घातपात करण्याची योजना आखत असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र एटीएसने शनिवारी पहाटे कुर्ला पश्चिम येथून २६ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. या तरुणाकडे कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. एटीएसच्या या कारवाईमुळे कुर्ला परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
साहब अहमदतूला खान (२६) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी पहाटे महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने त्याला कुर्ला पश्चिम विनोबा भावे नगर येथील एमआयजी कॉलनी येथील एका इमारतीतून ताब्यात घेतले आहे. साहब हा तरुण मॅकेनिकल इंजिनियर असून दोन महिन्यापूर्वीच त्याचे संपूर्ण कुटूंब कुर्ला पश्चिम एमआयजी कॉलनी येथे भाडेतत्वावर राहण्यास आले आहे.या पूर्वी हे कुटुंब कुठे राहण्यास होते याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. एटीएसने या तरुणाला ताब्यात घेतले त्या ठिकाणाहून लॅपटॉप, मोबाईल फोन आणि काही आक्षेपार्ह वस्तू तपासासाठी ताब्यात घेतले आहे.
हे ही वाचा:
उद्योग वर्धिनी: प्रत्येक हाताला काम!
सीसीटीव्हीमुळे पकडले गेले दोन सराईत मोबाईल चोर
विरोध ED ला, भ्रष्टाचाराला नाही !
एटीएसच्या सूत्राच्या म्हणण्यानुसार साहब हा तरुण जम्मू काश्मीर येथील एका दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता. या संशयावरून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेला तरुण हा एका मोठ्या कटात सामील असावा असा संशय देखील व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षात उच्चशिक्षित मुस्लिम तरुण दहशतवादाकडे ओढले जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. इंजीनियर असलेल्या तरुणांचा वापर दहशतवादी संघटनांकडून मोठ्या प्रमाणावर केला जात असून भारतातून आयसीस, अल कायदा अशा संघटनांनी या तरुणांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. त्यात अनेक तरुणांचा बळीही गेलेला आहे.