काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सध्या अंमलबजावणी संचलनालयाकडून चौकशी सुरू आहे. आम आदमी पार्टीचे नेते मनिष सिसोदीया यांच्या सारख्या अन्य काही टुच्चे नेतेही ईडीच्या सापळ्यात अडकलेले दिसतात. देशातील अनेक राजकीय नेत्यांना ही ईडीबाधा झालेली दिसते. त्यातूनच ईडीच्या घाऊक वापरा विरुद्ध विरोधी पक्षांकडून जनमत निर्माण करण्याचा प्रय़त्न होतोय. केंद्र सरकार ईडीच्या माध्यमातून देशातील लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करते आहे.