भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातून मिग- 21 विमान लवकरच निवृत्त होणार असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवार, २८ जुलै रोजी हवाई दलाच्या मिग- 21 विमानाचा अपघात झाला. त्यानंतर भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात असलेल्या मिग- 21 विमानांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
याच पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने मिग- 21 विमान हवाई दलातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. २०२५ पर्यंत हवाई दलाच्या ताफ्यातून मिग- 21 बाहेर पडणार आहेत. मिग- 21 विमाने भारतीय हवाई दलाचा गेल्या अनेक वर्षांपासून मोठा भाग आहेत.
भारतीय हवाई दलाच्या ताफ्यामध्ये १९६० पासून रशियन बनावटीच्या मिग- 21 विमानांचा समावेश आहे. ६२ वर्षांच्या इतिहासात मिग- 21 विमान अपघाताच्या २०० घटना घडल्या आहेत. एवढेच नाही तर गेल्या पाच वर्षांत भारतात विमान आणि हेलिकॉप्टर अपघातात ४२ जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर आता हवाई दलाने मिग विमानांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ताफ्यात असलेली चार मिग- 21 विमाने २०२५ पर्यंत भारतीय हवाई दलातून बाहेर पडणार आहेत.
हे ही वाचा:
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून सत्तेची मलई ओरपलीत तेव्हा कुठे होता मराठी बाणा?
राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही
संजय राऊतांची शिवीगाळ करत असतानाची ऑडियो क्लिप व्हायरल
धनुष्यातील ‘बाणा’सोबत ‘अर्जुन’ही शिंदेंसोबत
राजस्थानमध्ये २८ जुलै रोजी मोठी दुर्घटना घडली. बाडमेरमध्ये मिग- 21 विमान कोसळलं. हवाई दलाच्या मिग-21 मध्ये दोन पायलट होते आणि या अपघातात दोन पायलट शहीद झाले आहेत.