प्रजा फाऊंडेशनतर्फे मंगळवारी ‘मुंबईतील आमदारांचे प्रगती पुस्तक’ अहवाल जाहीर करण्यात आला. या अहवालात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या टॉप पाचमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तीन, शिवसेना, काँग्रेसच्या एका आमदारांनी बाजी मारली आहे. यामध्ये भाजपाचे आमदार अतुल भातखळकर, अमित साटम, पराग आळवणी यांचा समावेश आहे. तर काँग्रेसचे आमदार अमीन पटेल आणि शिवसेनेचे सुनील प्रभू यांचा टॉप पाचमध्ये समावेश आहे.
काँग्रेसचे आमदार अमीन पटेल (८१. ४३) प्रथमस्थानी, भाजपाचे आमदार पराग आळवणी (७९. ९६) दुसऱ्यास्थानी, तर शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू ( ७७. १९) हे तिसऱ्या स्थानावर आहेत. तर अमीन साटम चौथ्या स्थानी आणि अतुल भातखळकर हे पाचव्या स्थानी आहेत.
प्रजा फाऊंडेशनकडून करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात फक्त मुंबईतील ३१ आमदारांचा समावेश आहे. मुंबईतील ज्या आमदारांकडे मंत्रिपद होतं त्यांचा या सर्वेक्षणात समावेश नाही. त्यात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, शिवसेनेचे आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे नवाब मलिक, काँग्रेसचे अस्लम शेख, शिवसेनेचे रमेश लटके (मृत) यांच्या कामगिरीची समावेश आहे.
हे ही वाचा:
बाळासाहेबांचे नातू निहार ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने
“तरुण देशाचे तर भारत जगाच्या विकासाचे इंजिन”
पोलिसांच्या जीर्ण झालेल्या घरांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले हे आदेश
अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून आतापर्यंत मिळाले ५० कोटी
दरम्यान, या अहवालानंतर कोरोनाचा प्रारंभ झाल्यापासून ते आजपर्यंत त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला आहे. त्याचप्रमाणे, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. या दोन विषयांकडे आपल्या विधीमंडळाने अधिक लक्ष देण्याची गरज असल्याची सूचना प्रजातर्फे करण्यात आली आहे.