अनेकदा सामाजिक, धार्मिक कार्यात अन्न मोठ्या प्रमाणात शिल्लक राहते, या अन्नाची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी ‘नवी मुंबई वेडिंग अँड इव्हेंट’ असोसिएशनने एक नवा उपक्रमात पुढाकार घेतला आहे. संघटनेतील कॅटरर्सचे अन्न फेकून देण्याऐवजी त्याचा योग्य वापर करून खत निर्मिती करण्याचे प्रयत्न सुरु केले आहे.
सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात उरलेले अन्न गरजवंतापर्यंत पोहोचवण्यासाठी नवी मुंबईतील कॅटरर्सने एक नवा उपक्रम सुरू केला आहे. नवी मुंबईतील महानगर पालिकेच्या वतीने नियोजन करून या अन्नाचा योग्य वापर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर उरलेल्या अन्नापासून खतनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे खत नवी मुंबई महानगर परिसरातील उद्यान व सामाजिक संस्थना खत वापरण्यास दिले जाणार आहेत. शहरातील अन्नाची नासाडी कमी करण्याचा प्रयत्न करत आहे, तसेच काही हॉलमध्ये ग्राहकांना निवडक ठेकेदाराकडून कॅटरर्सची मागणी करण्यासाठी तगादा लावला जातो, परंतु सामान्य माणसांची लूट थांबवण्यासाठी हॉलबाहेर महापालिकेकडून फलक लावत मदतकेंद्राची माहिती नमूद करावी, अशी मागणी नवी मुंबई वेडिंग अँड इव्हेंट्स असोसिएशनचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी केली आहे.
हे ही वाचा:
“तरुण देशाचे तर भारत जगाच्या विकासाचे इंजिन”
पोलिसांच्या जीर्ण झालेल्या घरांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले हे आदेश
अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून आतापर्यंत मिळाले ५० कोटी
औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण नको; उच्च न्यायालयात १ ऑगस्टला सुनावणी
नवी मुंबई वेडिंग अँड इव्हेंट्स असोसिएशनचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने पालिका उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांची भेट घेतली. उपायुक्तांनी या कार्यक्रमाचे कौतुक करत मदत करण्यासाठी सकारात्मकता दर्शवली.