कुस्तीपटू पप्पू यादव यांनी ३२ वर्षांपूर्वी अंडर -१७ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्याच पावलावर पाऊल ठेवत आता ३२ वर्षांनतर भारताचा युवा कुस्तीपटू सूरज वशिष्ठ याने अंडर-१७ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. त्याने कुस्तीच्या ५५ किलो गटात सुवर्णपदक पटकावले आहे. सुरजने अंतिम सामन्यात अझरबैजानच्या फारिम मुस्तफायेवचा ११-० असा पराभव केला. सुरजच्या या कामिगरीमुळे भारतीयांच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा खोवला आहे.
या मॅचमध्ये सुरजने आक्रमक सुरुवात केली आणि शेवट्पर्यंत त्यांची आक्रमकता टिकवून ठेवली. त्याच्याच जोरावर तो अझरबैजानच्या कुस्तीपटूवर भारी पडला. सूरजच्या विजयाबद्दल अनेक जण त्याचे अभिनंदन आणि कौतुक करत आहेत. भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून सूरजचे अभिनंदन केले. त्याने सूरजचा फोटो ट्विट करून लिहिले की, सूरजने इतिहास रचला. ३२ वर्षांनंतर अंडर १७ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये देशाला सुवर्णपदक मिळाले. खूप अभिनंदन, असंच देशासाठी मेडल्स जिंकत राहा.
हे ही वाचा:
पोलिसांच्या जीर्ण झालेल्या घरांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले हे आदेश
अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून आतापर्यंत मिळाले ५० कोटी
औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण नको; उच्च न्यायालयात १ ऑगस्टला सुनावणी
मनी लॉन्डरिंग कायद्यातील तरतुदींना सर्वोच्च दिलासा; ईडीविरोधातील सुनावणी
जिंकणारा सूरज हा तिसरा भारतीय ग्रीको-रोमन कुस्तीपटू
सुरजने तब्बल ३२ वर्षांनंतर या स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक मिळवून दिले आहे. हे या स्पर्धेतील भारतासाठीचे हे तिसरे सुवर्णपदक आहे. पप्पू यांच्या आधी कुस्तीपटू विनोद कुमार यांनी १९८० मध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळेच १७ वर्षांखालील कुस्ती स्पर्धेत सूरजचा हा विजय अतिशय ऐतिहासिक आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा सूरज हा तिसरा भारतीय ग्रीको-रोमन कुस्तीपटू ठरला आहे.