भारतीय माध्यमांमधून दक्षिण आफ्रिकेने सिरम इन्स्टीट्युटच्या लसी परत पाठवल्याची वदंता असताना या बाबतचा फोलपणा समोर आला आहे. आफ्रिकेच्या आरोग्यमंत्र्यांनी स्वतःचा भारताच्या लसी परत पाठवत नसल्याचे सांगितले आहे.
दक्षिण आफ्रिकेचे आरोग्यमंत्री डॉ. झ्वेली मखिझे यांनी सांगितले की, मी स्पष्ट करू इच्छितो की आम्ही भारताच्या लसी परत पाठवलेल्या नाहीत. आम्ही ऍस्ट्राझेनेका लसी भारताला परत केलेल्या नाहीत.
याबरोबरच त्यांनी हे देखील सांगितले, की आम्ही खरेदी केलेले डोस आफ्रिकन युनियन प्लॅटफॉर्मला दिले आहेत. एयु या सर्व डोसेसचं ज्या देशांनी त्यांना लस मिळावी अशी विनंती केली आहे, देशांत वितरण करणार आहे.
याबाबत आणखी खुलासा करताना ते हे देखील म्हणाले, की या लसींची अंतिम मुदतीची दिनांक उलटून गेलेली नाही. आमच्या गुणवत्ता चाचणी नंतरच ३१ एप्रिल ही दिनांक निश्चित करण्यात आली होती. या लसींची अंतिम मुदत उलट गेली असल्याची चुकीची बातमी पसरवली गेली.
दक्षिण आफ्रिकेने जॉन्सन ऍण्ड जॉन्सन लसींचे ९ मिलीयन डोसेस आधीच मागवले आहेत आणि ८० हजार नवे लवकरच पोहोचतील. या आठवड्यापासून दक्षिण आफ्रिकेतील लसीकरण मोहिमेला सुरूवात होणे अपेक्षित आहे. दक्षिण आफ्रिकेला पुढील चार आठवड्यात ५ लाख डोसेस येतील. मार्च २०२१ अखेरपर्यंत फायझर लसींचे आणखी २० मिलीयन डोस दक्षिण आफ्रिकेला मिळणार आहेत.