31 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरराजकारणऔरंगाबादचे संभाजीनगर नामकरण नको; उच्च न्यायालयात १ ऑगस्टला सुनावणी

औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण नको; उच्च न्यायालयात १ ऑगस्टला सुनावणी

Google News Follow

Related

औरंगाबादच्या रहिवाश्याची याचिका

औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याचा वाद आता उच्च न्यायालयात गेला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर १ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असल्याचं कळतंय.

औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्यावरून बरीच वर्षे वाद हाेता. अनेकदा नामांतराची घाेषणा हाेऊनही विविध न्यायालयीन प्रकरणांमुळे त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी हाेत नव्हती. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वीच्या आपल्या अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली होती. पायउतार हाेण्यापूर्वी हा लाेकप्रिय निर्णय ठरेल असे वाटले. पण त्यानंतर औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. विविध थरातून नामांतराला विराेध हाेत असतानाच आता हा नामकरणाचा विषय उच्च न्यायालयात पाेहचला आहे.

औरंगाबादचे नाव बदलूून संभाजीनगर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला जनहित याचिकेद्वारे न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. औरंगाबादचे रहिवासी मोहम्मद मुश्ताक अहमद, अण्णासाहेब खंदारे व राजेश मोरे यांनी या संदर्भात याचिका दाखल केली आहे. सोमवारी मुख्य न्यायमूर्ती व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी हाेणार आहे.

राज्यात सत्ताबद्दल झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या नामांतराच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली होती. या निर्णयानंतर विरोधकांकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात आली हाेती. मात्र यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नव्या सरकारतर्फे यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे होणारच, नामांतराला स्थगिती दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले. शिंदे-फडणवीस सरकारने नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करून राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केला. पण आता औरंगाबादमधील रहिवाशांकडूनच नामांतरला विराेध करणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आता न्यायालय काय सुनावणी देते याकडे सर्वांचे लक्ष लागणार

हे ही वाचा:

वर्षभरात राज्यातील उर्वरित सर्व कांदळवन क्षेत्र राखीव वनाखाली आणणार

सिव्हील इंजिनिअर डिप्लोमा केलेल्यांना कंत्राटदार नोंदणीसाठी हिरवा कंदील

मध्य प्रदेशातही ‘सर तन से जुदा’चा प्रकार?

‘खोबरे गेले करवंटी हातात राहिली आतातरी शहाणे व्हा’

नामांतराला एमआयएमचा तीव्र विरोध

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहराच्या नामांतराला एमआयएमने तीव्र विरोध दर्शविला आहे . नामांतरचा निर्णय झाल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांच्या नेतृत्वाखील एमआयएमने शहरात मोठा मोर्चा काढला होता व नामांतराला विरोध केला होता.गुगल मॅप्सवर औरंगाबाद शहराचे नाव ‘संभाजी नगर’ करण्या प्रकरणी खासदार जलील यांनी याबाबत गुगलकडे स्पष्टीकरण मागणार असल्याचे म्हटले होते .यामुळेच नामकरणाचा हा विषय आगामी काळातही तीव्र होण्याची शक्यता आहे. १९९७ मध्ये नामकरणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला होता. पण न्यायालयाने स्थगिती दिली नव्हती, असे सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

काय आहे संभाजीनगर नावाचा इतिहास?

१९८८ मध्ये औरंगाबादच्या सभेत दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा हा औरंगाबादचे नाव संभाजीनगर नारा दिला होता. तेव्हापासून औरंगाबादेत शिवसेनेकडून औरंगाबादचे संभाजीनगर असा शहराचा उल्लेख केला जातो. ९ नोव्हेबर १९९५ या वर्षात राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे नामकरण करण्यासाठी असा प्रस्ताव औरंगाबाद महापालिकेने पाठवला. मात्र २००१ ला काँग्रेस आघाडी सरकाने रद्द ठरवला. आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत असताना संभाजीनगरचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यावर आता निर्णय होण्याची शक्यता आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा