29 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेष२१००० कोटींहून जास्त खर्च तरी मुंबईतले रस्ते खड्ड्यात का?

२१००० कोटींहून जास्त खर्च तरी मुंबईतले रस्ते खड्ड्यात का?

Google News Follow

Related

आमदार अमित साटम यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई शहरातील रस्ते आणि खड्ड्यांचा प्रदीर्घ प्रलंबित प्रश्न सरकारच्या नियोजन, दूरदृष्टी आणि विचाराच्या अभावामुळे सोडवला गेला नाही. गेल्या २४ वर्षात मुंबईतील रस्ते बनवण्यासाठी मुंबई महापालिकेने २१००० कोटींहून अधिक खर्च करूनही मुंबईतील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचा आराेप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला आहे.

प्रत्येक रस्त्यासाठी छाेट्या निविदा काढण्यापेक्षा पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे, व शहरांसाठी प्रत्येकी एक फक्त ३ निविदा काढण्याची बीएमसीला सूचना द्यावी, अशी मागणी आमदार साटम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे. या निविदांमधील अटी अशा असाव्यात की भारत सरकार आणि एनएचएआय साेबत काम करणाऱ्या माेठ्या पायाभूत सुविधा कंपन्यांनाच निविदेत भाग घेता येतो. पाणी, गॅस वीज इंटरनेट इत्यादी विविध युटीलिटीज टाकण्यासाठी वारंवार खाेदकाम व खड्डे पडू नयेत यासाठी रस्त्याच्या निविदेतच युटिलिटी काॅरिडाेर बनवण्याची तरतूद असावी याकडेही साटम यांनी पत्रात लक्ष वेधले आहे.

हे ही वाचा:

वर्षभरात राज्यातील उर्वरित सर्व कांदळवन क्षेत्र राखीव वनाखाली आणणार

सिव्हील इंजिनिअर डिप्लोमा केलेल्यांना कंत्राटदार नोंदणीसाठी हिरवा कंदील

मध्य प्रदेशातही ‘सर तन से जुदा’चा प्रकार?

‘खोबरे गेले करवंटी हातात राहिली आतातरी शहाणे व्हा’

असंघटित फेरीवाल्यांच्या नियमनाची गरज

शहरातील असंघटित फेरीवाल्यांचा प्रश्न गुंतागुंतीचा  झाला असून त्यांचे नियमन करण्याची गरज आहे. झाेनल टाऊन व्हेंडिंग समित्यांनी हाॅकिंग झाेन निश्चित केले आहेत आणि १.२८ लाख हाॅकर्सना हॅकिंग पिच वाटप करण्यास पात्र बनवले आहे. मागील सरकारने २०१९ चे नवीन सर्वेक्षण हाेईपर्यंत या प्रक्रियेला अविचारीपणे स्थगिती दिली. नियुक्त हाॅकिंग झाेनमधील हाॅकिंग पिचेस पात्र फेरीवाल्यांना द्यावेत व आमचे ऊर्वरित रस्ते आणि फूटपाथ माेकळे करा. नवीन सर्वेक्षण एकाच वेळी केले जाऊ शकते असेही साटम यांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा