नुपूर शर्मा यांना समर्थन देणाऱ्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपीला आर्थर रोड तुरुंगात कैद्यांनी चोप दिला. शाहरुख पठाण असे या आरोपीचे नाव आहे.
शाहरुख पठाण याने नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात अटक झाली आहे. आर्थर रोड तुरुंगात इतर कैद्यांशी चर्चा सुरू असताना कशासाठी अटक झाली हे सांगितल्यावर त्याला मारहाण झाली.
शाहरुख पठाण सोबत असणारे आरोपी कल्पेश पटेल, हेमंत मनेरिया, अरविंद यादव, श्रावण चव्हाण आणि संदीप जाधव यांनी पठाणवर हल्ला केला. जेल प्रशासनाने तात्काळ त्यांना बाजूला केलं आणि वेगळ्या बराकमध्ये हलवलं. शाहरुख पठाणच्या हाताला आणि गळ्याला थोडा मार बसला आहे. त्याच्यावर कारागृहात उपचार करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नूपुर शर्माचा वाद आता तुरुंगापर्यंत पोहोचला आहे. अमरावती येथे उमेश कोल्हे यांची नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याला समर्थन केल्याच्या मुद्द्यावरून हत्या करण्यात आली होती. पाच जणांनी हा हल्ला केला. ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुरुंग अधिकारी अमोल चौरे यांनी यासंदर्भात मारहाण व शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा:
माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
मनी लॉन्डरिंग कायद्यातील तरतुदींना सर्वोच्च दिलासा; ईडीविरोधातील सुनावणी
ज्या बाळासाहेबांचा फोटो लावता त्यांच्या मुलाला गादीवरून खाली उतरवले!
औषध, वैद्यकीय उपकरणे खरेदीला स्थगिती आदेश लागू नाही
एनआयएकडून सात आरोपी अटकेत
दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने उमेश कोल्हे हत्या प्रकरणात सात आरोपींना अटक केली आहे.
सध्या हे आरोपी ऑर्थर रोड कारागृहात कैदेत आहेत. ऑर्थर रोडमधल्या बराक नंबर ७ मध्ये हे कैदेत होते. आरोपींमध्ये मुख्य सूत्रधार इरफान खान याचाही समावेश आहे. आरोपी मुदस्सीर अहमद ऊर्फ सोनू रजा शेख इब्राहिम (२२), शाहरुख पठाण ऊर्फ बादशाह हिदायत खान (२५), अब्दुल तौफिक ऊर्फ नानू शेख तस्लिम (२४), शोएब खान ऊर्फ भुऱ्या साबीर खान (२२), अतिब रशीद आदिल रशीद (२२), युसूफ खान बहादूर खान (४४) तसेच सूत्रधार शेख इरफान शेख रहीम (३५)