नांदेड जिल्ह्यातील वजीराबाद या ठिकाणी ६ वर्षांपूर्वी झालेल्या एका हत्याच्या प्रकरणात बब्बर खालसा या संघटनेचा दहशतवादी हरविंदरसिंघ उर्फ रिंधा याचा साथीदाराला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे.
दिलप्रितसिंघ ओमकारसिंघ डहाण (३०) असे अटक करण्यात आलेल्या रिंधाच्या साथीदार दहशतवाद्याचे नाव आहे. नांदेड जिल्ह्यातील वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१६ मध्ये अवतारसिंघ उर्फ मन्नु जसवंतसिंघ गाडीवाले याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तर एका पोलीस शिपायाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
या प्रकरणी वाजीराबाद पोलीस ठाण्यात हत्या आणि हत्येचा प्रयत्न गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही हत्या बब्बर खालसा संघटनेचा दहशतवादी रिंधा याचा विरोधक असणारा रोशन माळी याला मृत अवतारसिंग हा मदत करीत असल्याचा संशय होता. रिंधाच्या सर्व खबरी त्याला पोहचवत असल्याच्या कारणावरून अवतारसिंग याची हत्या करण्यात आली होती अशी माहिती तपासात समोर आली होती.
हे ही वाचा:
शिवसेना म्हणजे ठाकरे अँड सन्स…
‘खोबरे गेले करवंटी हातात राहिली आतातरी शहाणे व्हा’
आक्षेपार्ह फोटो प्रकरणी अभिनेता रणवीर विरोधात गुन्हा दाखल
मध्य प्रदेशातही ‘सर तन से जुदा’चा प्रकार?
या हत्येत पाकिस्तान मध्ये असणारा रिंधा याचा साथीदार दिलप्रितसिंघ याचा सहभाग असल्याचे समोर आले. या गुन्ह्याचा तपास राज्य दशतवाद विरोधी पथक करीत होते, दिलप्रीतसिग हा पंजाब येथील एका हत्येचा गुन्हयात मध्यवर्ती कारागृह, भटींडा येथे शिक्षा भोगत असल्याची माहिती तपासा दरम्यान समोर आली.दरम्यान एटीएसच्या नांदेड पथकाने सोमवारी दिलप्रीतसिग याचा ताबा घेऊन त्याला हत्येच्या गुन्हयात अटक केली आहे.