31 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरक्राईमनामाआक्षेपार्ह फोटो प्रकरणी अभिनेता रणवीर विरोधात गुन्हा दाखल

आक्षेपार्ह फोटो प्रकरणी अभिनेता रणवीर विरोधात गुन्हा दाखल

Google News Follow

Related

अभिनेता रणवीर सिंग हा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. आक्षेपार्ह फोटो प्रकरणी अभिनेता रणवीर सिंगवर मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे रणवीरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी रणवीरने न्यूड फोटोशूट केले होते. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरम्यान श्याम मंगाराम फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या ललित श्याम टेकचंदानी यांनी महिलांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत चेंबूर पोलीस ठाण्यात सोमवार,२५ जुलैला तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आज, मंगळवारी रणवीर विरोधात भादंवि कलम २९२, २९३, ३५४, ५०९, आयटी कायदा कलम ६७(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीत ललित श्याम टेकचंदानी यांनी म्हटले आहे की, बॉलीवुड अभिनेता रणवीर सिंग यांने त्याचे इन्स्टाग्राम अकाउंट व ट्विटरवर त्याचे अंगावर कपडे नसलेले फोटे शेअर केले. सदर फोटो मोठ्या प्रमाणात सर्वत्र प्रसारित झाले असून आपला भारत देश हा संस्कृती प्रधान देश आहे. तसेच तरूण पिढी अभिनेता अभिनेत्री यांचं अनुकरण करतात.

समाजातील अनेक तरुण मुले किंवा स्ट्रगल करणारे फिल्म इंडस्टींमधील तरुण अभिनेते ही अर्थिक उद्देशाने अथवा प्रसिध्दी मिळविण्याकरीता त्याचे अनुकरण करण्याची शक्यता असून त्यामुळे समाजाची दुरावस्था होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अभिनेता रणविर सिंग याने समाजातील तरुण वर्गास नितीभ्रष्ट करण्याचा किंवा समाज बिघडविण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच त्याच्या अशा कृत्यामुळे महीलांच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न झाली आहे. म्हणुन मी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने अभिनेता रणविर सिंग यांचे विरोधात भादवि कलम २९२, २९३, ५०९ सह आयटी ऍक्ट ६७(अ) प्रमाणे तक्रार देत आहे.

हे ही वाचा:

तृणमूलच्या सात खासदारांसह १९ खासदारांवर निलंबनाची कारवाई

सोनिया गांधींची पुन्हा ईडी चौकशी; आंदोलन करणारे राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात

नरेंद्र मोदी तुमचे वडील नव्हते, मग त्यांचे फोटो वापरून का निवडणूक लढविली?

…म्हणून भालाफेकपटू नीरज चोप्राने राष्ट्रकुल स्पर्धेतून घेतली माघार

तक्रारदारांच्या वकिलांनी म्हटले की, आमची मागणी रणवीर सिंहला अटक करावी, अशी आहे. कलमांची व्याप्ती पाहता भादंवि कलम २९२ अंतर्गत ५ वर्षे, कलम २९३ अंतर्गत ३ वर्षे शिक्षेची तरतूद आहे. तसेच आयटी कायदा कलम ६७(अ) नुसार ५ वर्षांची शिक्षा होऊ शकते. यामुळे आता या रणवीर सिंगवर अटकेची टांगती तलवार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा