24 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरराजकारणपराभवानंतर राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचे 'एकला चालो रे!'

पराभवानंतर राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचे ‘एकला चालो रे!’

Google News Follow

Related

तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी आता एकला चालो रेचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्याकडून सिन्हा यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे यशवंत सिन्हा यांनी आता स्वतंत्रपणे वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आहे.

तृणमूल काँग्रेससोबत जाणार असल्याच्या बातम्या चुकीच्या असून आपण स्वतंत्रपणेच यापुढे वाटचाल करू असे ८४ वर्षीय सिन्हा यांनी म्हटले आहे.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, मी आता स्वतंत्र वाटचाल करणार असून कोणत्याही पक्षात जाणार नाही. कुणीही माझ्याशी बोललेले नाही किंवा मीदेखील कुणाशी बोललेलो नाही. पण मी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्कात आहे. सार्वजनिक जीवनात आपली कोणती भूमिका असेल हे ठरवायचे आहे. मी आता ८४ वर्षांचा आहे. आणखी किती काळ मला काम करायचे आहे, हे बघावे लागेल.

यशवंत सिन्हा यांनी गेल्या महिन्यात ट्विट केले होते की, ममताजींच्या प्रती मी आदर व्यक्त करतो. पण एका व्यापक दृष्टिकोनातून मी पक्षातून बाहेर पडत आहे. पण विरोधी गटाच्या एकतेसाठी काम करत राहीन. माझ्या या निर्णयाचा त्या स्वीकार करतील अशी अपेक्षा आहे.

हे ही वाचा:

सोनिया गांधींची पुन्हा ईडी चौकशी; आंदोलन करणारे राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात

तृणमूलच्या सात खासदारांसह १९ खासदारांवर निलंबनाची कारवाई

नरेंद्र मोदी तुमचे वडील नव्हते, मग त्यांचे फोटो वापरून का निवडणूक लढविली?

मेट्रो कारशेडच्या कामासाठी फांद्या तोडल्या जात असताना झाडे कापल्याचा कांगावा

 

जून महिन्यात त्यांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला होता. यशवंत सिन्हा यांनी याआधी भाजपा सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली होती. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना सिन्हा हे मंत्री होते. २०१८मध्ये त्यांनी भाजपातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. २०२१च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी ते तृणमूलमध्ये दाखल झाले. वाजपेयींच्या काळातील राजकारण मोदींच्या काळात बदलले आहे, अशी त्यांची भूमिका होती. त्यातून त्यांनी पक्षाचा त्याग केला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा