चीनमधल्या बँकिंग क्षेत्रावर मोठं संकट आलंय आणि त्यामुळे चीनमधल्या बँकांनी ग्राहकांची खाती गोठवून ठेवलीत. त्यामुळे अर्थात या बँकांविरोधात आंदोलन सुरू झालंय. बँकेच्या बाहेर ग्राहक मोठ्या संख्येने जमतायत आणि आमचे पैसे परत करा अशी मागणी करत आहेत. चीनमध्ये काही बँकांकडे रोख रक्कम नसल्याने संकट निर्माण झालं आहे. नागरिकांना रोखण्यासाठी बँकांच्या बाहेर खडा पहारा ठेवण्यासाठी हे रणगाडे चीनने उभे केले आहेत.