राज्यातील सत्तारानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना पुन्हा मोठा धक्का बसला आहे. युवासेनाप्रमुख आणि माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे आता केंद्र सरकारच्या रडारवर आल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारकडून आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणमंत्री म्हणून गेल्या अडीच वर्षांच्या काळात घेतलेल्या निर्णयांचे आणि कामकाजाचे ऑडिट होणार आहे.
महाविकास आघाडीच्या काळात आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरणमंत्रीपद होते. या खात्याचे ऑडिट सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र प्रदूषण मंडळातील कारभाराचे ऑडिटही सुरु केले आहे. मुंबई, पुणे, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, कोल्हापूर, औरंगाबाद, रायगड आदी विभागांतील कार्यालयात हे केंद्रीय ऑडिट सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यालयाबरोबर नागपूर कार्यालयाचा समावेश आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यात इतर विभागीय कार्यालयांचेही ऑडिट करण्याबाबत खातेप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा:
“जो राष्ट्रवादी और काँग्रेस के जंजिरो में अटके है, वो खंजीर खुपसने की बात ना करे”
पर्समधून बाळाला पळवून नेणारी नर्स ताब्यात
“धनगर समाजाच्या समस्या, प्रश्न मार्गी लावणार”
द्राैपदी मुर्मू साेमवारी घेणार राष्ट्रपतीपदाची शपथ; २१ ताेफांची सलामी देणार
दरम्यान, आदित्य ठाकरे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा आता पक्ष पुन्हा उभा करण्यासाठीही मैदानात उतरले आहेत. केंद्राच्या या निर्णयामुळे आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.