द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या १५व्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे. त्या देशातील आदिवासी समाजातील पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. त्यानंतर आज, २५ जुलै रोजी सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी द्रौपदी मुर्मू यांनी शपथ ग्रहण केली. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी शपथ दिली
मावळते राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनातून संसद भवनापर्यंत मार्गक्रमण केले. शपथविधीच्या वेळी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री, खासदार आदी उपस्थित होते. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांना या सोहळ्यासाठी बोलावण्यात आले होते.
हे ही वाचा:
ऑगस्ट महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद!
मविआ सरकारच्या काळात अघोषित आणीबाणी होती!
अग्निपथमध्ये नौदल प्रवेशासाठी महिलांची पसंती
दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही
देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर विराजमान होणाऱ्या द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील पहिल्या नागरिक ठरल्या आहेत. राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला झालेली निवडणूक एकतर्फी ठरली होती. या निवडणुकीत मुर्मू यांना ६४ टक्के, तर प्रतिस्पर्धी यशवंत सिन्हा यांना ३६ टक्के मते मिळाली होती. या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी गटाचे यशवंत सिन्हा यांना पराभूत केले होते.