राज्य मार्ग परिवहन महामंडळ कायदा १९५० अन्वये टप्पे प्रवासी वाहतूक करण्याचे अधिकार फक्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला आहेत. त्यामुळे शासन इतर कुणालाही टप्पे प्रवासी वाहतूक करण्याचे अधिकार देऊ शकत नाही. राज्यामध्ये आजही काही शासनाच्या परवानगीने व काही अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर धावत आहेत. ज्यांना प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे, अशी वाहने टप्पे वाहतुकीची परवानगी नसतांना टप्पा वाहतूक करीत आहेत व क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक सुद्धा करीत आहेत. रोजगार व शासनाला उत्पन्न मिळेल या नावाखाली मॅक्सी कॅबसारख्या वाहनांना परवानगी देण्याचा विचार राज्य सरकारमधील काही अधिकारी करीत आहेत.