मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आरे कारशेडवरील बंदी उठवली आहे. त्यामुळे अखेर आरेच्या जंगलातील कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. आता आरेतील कारशेडचं रखडलेलं काम लवकरच सुरु होणार आहे. महाविकास आघाडी सरकारने आरे कारशेडच्या प्रकल्पात अहंकारापोटी आडकाठी घातली होती. पण शिंदे फडणवीस सरकारने कारशेडच्या कामाला हिरवा कंदील दाखवला आहे.