सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी न बाळगल्यास त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता असते. असाच एक प्रकार मध्य मुंबईतील तरुणासोबत घडला आहे. फेसबुकवर बोगस प्रोफाईल तयार करून तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. आरोपी तरुणाचा पर्दाफाश करण्यात प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांना यश आले आहे. आरोपी सय्यद अहमद नावाच्या तरुणाला झारखंड येथून पोलिसांनी अटक केलं आहे.
मूळचा झारखंडचा रहिवाशी असलेला सय्यद अहमद याने फेसबुक वर अनेक तरुणांच्या नावाने बोगस प्रोफाईल तयार केले होते. अशाच एका प्रोफाईलचा वापर करून मध्य मुंबई येथील तरुणाला फेसबुक वर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. पीडित तरुणाने शहनिशा न करता फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर फेसबुकवर त्यांच्यात मैत्री झाली. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पिडीत तरुण गोड बोलण्याच्या स्वभावाला बळी पडला. आरोपी तरुणाने एका तरुणीचा फोटो पाठवून लग्नासाठी विचारणा केली असता, तरुणाने लग्नासाठी होकार दिला.
हे ही वाचा:
अक्षय कुमार सर्वाधिक कर भरणारा अभिनेता
परिचारिका असल्याचे भासवून एक दिवसाच्या बाळाचे अपहरण
WHO कडून ‘मंकीपॉक्स’ जागतिक आणीबाणी म्हणून घोषित!
शिवसेना फुटण्याचे श्रेय केवळ उद्धव ठाकरे यांचे!
विश्वास संपादन करून तरुणीने त्याच्या कडून वेगवेगळ्या कारणासाठी पैसे मागवले. आई आजारी असून, उपचारांसाठी पैसे हवे आहेत. घर खर्चाला पैसे नाहीयेत, थोडी मदत कर अशा हेतूने २४ लाख ६७ हजार रुपये टप्प्याटप्प्याने खात्यात वळते केले. संबंधित तरुणी भेटण्यासाठी टाळाटाळ करत असून, आपली फसवणूक झाली आहे हे, लक्षात येताच तरुणाने वडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. आरोपीला शोधण्यासाठी पोलिस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश नागवडे सह पोलीस पथकाने तपासाला सुरुवात केली. संबंधित आरोपी तरुणी नसून, बोगस तरुण आहे.