रेल्वे स्थानकावर मित्रांसोबत मजा करणं एका मुलाच्या जीवावर बेतलं आहे. ही घटना मुंबईत घडली असून, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात तरुण कांदिवली स्थानकावर त्याच्या मित्रांसोबत मस्ती करत होता. मस्तीमध्ये मित्राने धक्का दिला असता तो तरुण थेट रेल्वेवर जाऊन धडकला आहे.
ही धक्कादायक घटना कांदिवली रेल्वे स्टेशनवर घडली आहे. स्टेशनवर नेहमीप्रमाणेच वर्दळ होती. प्रवासी ये-जा करत होते. दरम्यान स्टेशनवर काही मुलांची मस्ती चालली होती. मजामस्ती करताना एका मुलाने दुसऱ्याला धक्का दिला. हा धक्का इतका जोरदार होता. की दुसऱ्या मुलाचा तोल जाऊन आणि तो थेट रेल्वे ट्रॅकच्या दिशेने जाऊन पडला. त्याच वेळी मागून रेल्वे आली त्या रेल्वेने मुलाला जोरदार धडक दिली. ही संपूर्ण घटना स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. आता तो व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
हे ही वाचा:
उमेश कोल्हे हत्येप्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी
गद्दार कोण? राहुल शेवाळे यांनी दिले उत्तर
पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपती कोविंद यांना फेअरवेल डिनर
बजरंग दलाने कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयावर लिहिले हज हाऊस
अपघातग्रस्त मुलाच्या पालकांनी या प्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. तरुणाचा अपघात होता की आत्महत्या हे तपासात स्पष्ट होईल. गुरुवार, २१ जुलै रोजी दुपारी साडे चारच्या सुमारास कांदिवली स्थानकावर ही घटना घडली आहे. बोरिवली रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकल ट्रेनने धडकलेल्या तरुणाला जखमी अवस्थेत जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.