गेल्या महिन्यात अमरावतीतील उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. उमेश कोल्हे यांनी भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली होती. कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी सात आरोपींना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलं आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयएन) आज, २२ जुलै रोजी उमेश कोल्हे हत्याकांडातील सात आरोपींना अमरावती येथील विशेष एनआयए न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ उमेश कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी व्हाट्सअपवर पोस्ट शेअर केली होती.
कोल्हे २१ जूनच्या रात्री दुकान बंद करून घरी परतत असताना, शर्मा यांना पाठीशी घालत असल्याच्या कारणावरून त्यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा संकेत दुसऱ्या दुचाकीवर होता. हल्ला झाल्यानंतर कोल्हे यांना रुग्णालयात नेण्यात आले होते पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
हे ही वाचा:
गद्दार कोण? राहुल शेवाळे यांनी दिले उत्तर
पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपती कोविंद यांना फेअरवेल डिनर
बजरंग दलाने कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयावर लिहिले हज हाऊस
उत्तर प्रदेशचा अब्दुल जमील झाला श्रवणकुमार
कोल्हे यांचा मुलगा संकेत कोल्हे यांने दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी २३ जून रोजी मुदस्सीर अहमद आणि शाहरुख पठाण या दोघांना अटक केली. दोघांची चौकशी केल्यानंतर हत्येत आणखी चार जणांचा सहभाग असल्याचे समोर आले. उर्वरित आरोपी अब्दुल तौफिक, शोएब खान, अतिब रशीद आणि शमीम फिरोज अहमद आणि हत्येचा मास्टरमाइंड इरफान शेख यांनाही अटक करण्यात आली. आता या सात आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलं आहे.