शिवसैनिक दूर गेले आणि युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी यात्रा सुरू केल्या. याआधी अशा गाठीभेटी घेतल्या नाहीत, अशी टीका प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.
आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सुरू आहे. या यात्रेतून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार यांच्यावर टीका करत आहेत. यादरम्यान, दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरे यांच्यावर टोलेबाजी केली आहे. केसरकर म्हणाले, आदित्य ठाकरे तरुण आहेत. कसे बोलावे, वागावे हे आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंकडून शिकावे. आदित्य ठाकरे आमच्या अर्ध्या वयाचे आहेत मात्र, ते आले की आम्ही खुर्चीवरून उठतो कारण त्यांच्या आजोबांना आम्ही मान देतो.
आदित्य ठाकरे यांनी ज्यांच्या रक्तात शिवसेना नव्हती ते पळून गेले असं वक्तव्य केलं होत. त्यावर केसरकर म्हणाले, आदित्य ठाकरे यांच्या रक्तात शिवसेना आली आहे. मात्र आमच्या रक्तात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भिनवली आहे, असे म्हणत केसरकरांनी खरे शिवसैनिक असल्याची त्यांना आठवण करून दिली आहे.
पुढे केसरकर म्हणाले, शिवसेना ही एका नेत्यामुळे उभी झालेली नाही. ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं त्यांच्यामुळे शिवसेना उभी झाली आहे. त्यामुळे आज शिवसैनिकांचा अपमान होता कामा नये आणि यांच्या रक्तामध्ये शिवसेना नाही का? असा सवाल जनतेने विचारला पाहिजे. संजय राठोड लग्न ठरलं तर शिवसेना साठी तुरुंगात होते. सासरे म्हणाले तुम्ही नाही आले तर तुमच्या फोटोशी लग्न लावेन. असे राठोडांचे उदाहरण देत याला शिवसेना म्हणतात असे केसरकर यावेळी म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
२०२३ मध्ये भारताचे ‘गगनयान’ अंतराळात झेपावणार!
शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा २६ जुलैला विस्तार
पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपती कोविंद यांना फेअरवेल डिनर
बजरंग दलाने कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयावर लिहिले हज हाऊस
भुमरे साहेब कितीवेळा जेलमध्ये गेले. पाचवेळा आमदार झाले. पण त्यांनी कधी मंत्रीपद मागितले नाही. शिवसेनेसाठी ते एक वर्ष जेलमध्ये होते आणि मग त्या शिवेसैनिकांच्या पक्षनिष्ठेवर शंक घेत असाल तर ते आमच्या मनाला लागलं असल्याचे केसरकर म्हणाले आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी शिवसैनिक नसल्याची टीका करू नये, हेच दिपक केसरकर यांना सांगायचे होते.