अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) आता राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार पटेल यांचे मुंबईतील वरळी येथे असलेले सीजे हाऊसमधील घर ईडीने जप्त केले आहे. ही इमारत वरळीत ऍट्रिया मॉलच्या समोरच्या परिसरात आहे. याच ठिकाणी ईडीने कारवाई केली आहे. ईडीने सीजे हाऊसमधील चार मजल्यांवर कारवाई केली आहे. इक्बाल मिर्चीसोबत झालेल्या व्यवहाराप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे.
ईडीकडून प्रफुल्ल पटेल यांची याआधी दोनवेळा चौकशी झाली आहे. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. दोनवेळा केलेल्या चौकशीनंतर ईडीने जो तपास केला त्यानंतर पटेल यांच्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अतिशय जवळचे, निकटवर्तीय म्हणून प्रफुल्ल पटेल यांची ओळख आहे. ईडीला ज्या पद्धतीने त्यांच्या संपत्तीच्या, मालमत्तीच्या व्यवहाराच्या नोंदींविषयी अनियमितता आढळली होती. याचमुळे प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे राष्ट्रवादी पक्षाला माेठा धक्का बसला आहे.
हे ही वाचा:
द्रौपदी मुर्मू यांच्या विजयासाठी वीस हजार लाडू तयार
महाराष्ट्रातील आमदारांच्या पात्रतेबाबत १ ऑगस्टला सुनावणी
रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती
शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता द्या, एकनाथ शिंदेंच्या बाजूने केंद्रीय आयोगाला पत्र
इक्बाल मिर्चीचा संबंध
माजी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांची या प्रकरणात १२ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. पटेल यांच्या मालकीच्या वरळीतील व्यावसायिक इमारतीचे चार मजले इक्बाल मिर्ची याच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केले आहेत. पटेल आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या एका फर्मने सीजे हाऊस एका भूखंडावर विकसित केले होते जेथे मिर्चीचीही काही मालमत्ता होती असे म्हटले जाते. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यानंतर आपलं म्हणणं मांडलं होतं. आता याच प्रकरणात ईडीने चार मजले म्हणजेच प्रफुल्ल पटेल यांचं घर जप्त केलं आहे.