25 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरअर्थजगतबिल गेट्स यांना टाकले मागे; गौतम अदानी जगातील चौथ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती

बिल गेट्स यांना टाकले मागे; गौतम अदानी जगातील चौथ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती

Google News Follow

Related

भारतीय उद्योगपती गौतम अदानी हे मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकत जगातील चौथ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती बनली आहे. ६० वर्षीय बिझनेस टायकूनची संपत्ती गुरुवारी ११५.५ अब्ज डॉलरवर पोहोचली आणि गेट्स यांची संपत्ती १०४.६अब्ज डॉलर्स नोंद झाली आहे. या यादीत मुकेश अंबानी ९० अब्ज डॉलरच्या संपत्तीसह १० व्या क्रमांकावर आहेत. टेस्ला आणि स्पेसएक्सचे संस्थापक एलन मस्क २३५.८ अब्ज डॉलर्ससह या यादीत अव्वल स्थानावर आहेत.

“अदानी समूहाच्या काही सूचीबद्ध समभागांमध्ये गेल्या दोन वर्षांत ६००% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीनुसार गौतम अदानी चौथा स्थानावर आहेत, पण त्याच्या पुढे पहिल्या तीन स्थानावर असलेल्या लोकांमध्ये एलन मस्क यांचा समावेश आहे जे ५२३० अब्ज संपत्तीसह पहिल्या स्थानावर आहेत तर व्हिटॉनचे बनाई औरनॉल्ट दुसऱ्या स्थानावर अमेझॉनचे जेफ बेझोस स्थानावर आहेत रिलायन्स इंडस्ट्रीचे अरमन मुकेश अंबानी ८८ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १० व्या स्थानावर आहेत. फोर्ब्स रिअल टाईम बिलियनेअर लिस्टनुसार, पहिल्या चार श्रीमंतांमध्ये गौतम अदानी यांनी ५२.३ अब्जाची सर्वाधिक संपत्ती आहे. त्याचबरोबर मुकेश अंबानीच्या संपत्तीत १५ अब्जांची भर पडली.

“अवघ्या तीन वर्षात, अदानीने सात विमानतळांवर आणि भारताच्या जवळपास एक चतुर्थांश हवाई वाहतुकीवर नियंत्रण मिळवले आहे. अदानी यांनी गुरुवारी सांगितले की समूहाने गॅडोटच्या भागीदारीत इस्रायलमधील बंदराच्या खाजगीकरणासाठी निविदा जिंकली आहे. हैफा बंदर हे इस्रायलच्या तीन प्रमुख आंतरराष्ट्रीय बंदरांपैकी सर्वात मोठे बंदर आहे.

हे ही वाचा:

द्रौपदी मुर्मू यांच्या विजयासाठी वीस हजार लाडू तयार

महाराष्ट्रातील आमदारांच्या पात्रतेबाबत १ ऑगस्टला सुनावणी

रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता द्या, एकनाथ शिंदेंच्या बाजूने केंद्रीय आयोगाला पत्र

५ जी लिलावात होणार सहभागी

रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियासह अदानी डेटा नेटवर्क्सनेही आगामी ५ जी लिलावात सहभागी होण्यासाठी अर्ज केला आहे. २६ जुलै रोजी सुरू होणार्‍या स्पेक्ट्रम लिलावात काही फ्रिक्वेन्सी बँडसाठी आक्रमक बोली दिसू शकते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा