भारतात प्रथमच पाणबुडीवर स्वदेशी ट्रोपेडो सिस्टम फायर कंट्रोल कार्यान्वित करण्यात आलेल्या ‘आयएनएस सिंधुध्वज’ ही पाणबुडी ३५ वर्षांनी भारतीय नौदल सेवेतून अखेर शनिवारी दिनांक १६ जुलै रोजी निवृत्त झाली. मूळ रशियन बनावटीच्या पाणबुड्यापैकी भारतीय नौदल सेनेत आता फक्त सात पाणबुड्या शिल्लक आहेत.
भारतीय नौदलाने रशियाच्या सहकार्याने या पाणबुडी नौकेची बांधणी रशियात केली असून, ‘सिंधू’ श्रेणी अंतर्गत पहिली ‘सिंधुघोष’ पाणबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात सन १९८६ मध्ये दाखल करून घेण्यात आली होती, २००० च्या दरम्यान टप्प्याटप्प्याने ऐकून १० पाणबुड्या युद्धनौका भारतीय नौदल ताफ्यात दाखल झाल्या. शनिवारी निवृत्त झालेली ‘INS सिंधूध्वज’ हि दुसऱ्या श्रेणीतील पाणबुडी असून पहिल्या श्रेणीतील ‘सिंधुघोष’ ही अजूनही नौदलाच्या ताफ्यात आहे.
सर्वाधिक अत्याधुनिक असलेली ‘सोनार’ रडार प्रणाली, स्वदेशी उपग्रह संवाद प्रणाली ‘रुक्मिणी’, अत्याधुनिक दिशादर्शक प्रणाली अशा सर्व प्रणालीचा वापर करण्याचा मान हा ‘आयएनएस सिंधुध्वज’ पाणबुडीला मिळाला. अशा दैदीप्यमान इतिहासानंतर शनिवारी पाणबुडी निवृत्त झाली. सिंधू श्रेणीतील १० पैकी ६ युद्ध नौकेचे गृहतळ हे मुंबई येथे असून त्यापैकी एका युद्धनौकेचा स्फोट झाल्याने ती ताफ्यातून काढून टाकण्यात आली. सन २०२० ला ‘आयएनएस सिंधुवीर’ म्यानमारला भेट देण्यात आली.
हे ही वाचा:
शिवसेना नेते रामदास कदम यांचा राजीनामा
राज्य शासनाकडून अपघातग्रस्तांना १० लाखाची मदत जाहीर
“सभागृह म्हणजे लोकशाहीचं तीर्थक्षेत्र”
अमेरिकेतील इंडियाना स्टेट मॉलमधल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इनोव्हेशनसाठी CNS रोलिंग ट्रॉफी प्रदान करण्यात आलेली ही एकमेव पाणबुडी आहे. ‘आयएनएस सिंधुध्वज’ चे गृहतळ मुंबई येथे असले तरी विशाखापट्टणम येथे निरोप समारंभ पार पडला. या वेळी पूर्व नौदल कमांडचे प्रमुख व्हाइस ऍडमिरल बिस्वजित दासगुप्ता ह्यांच्या उपस्तितीत निरोप दिला. या वेळी पाणबुडीवर सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांना सह खलाशी सुद्धा उपस्थित होते.