संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत असून १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “हा काळ खूप महत्वाचा आहे. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाचा कालखंड आहे. येणाऱ्या २५ वर्षांनी देश शताब्दी साजरी करेल. या काळात आपल्याला अनेक नवे संकल्प करायचे आहेत.”
तसेच हे अधिवेशन महत्वाचं आहे. या अधिवेशनात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले. “आम्ही नेहमी सभागृहाला संवादाचं सक्षम माध्यम मानतो, लोकशाहीचे तीर्थक्षेत्र मानतो, जिथं खुल्या मनानं संवाद होतात. गरज पडल्यास वादविवाद व्हायला पाहिजे. विश्लेषण झालं पाहिजे. त्यामुळे माझं सर्व सदस्यांना आवाहन आहे की गहन चर्चा व्हाव्यात. उत्तम चर्चा आवश्यक आहे. यासाठी सर्वांचं सहकार्य हवं. सर्वांच्या प्रयत्नानं सभागृह चालतं. त्याने चांगले निर्णय सदनात घेतले जातात,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी सुल्ताना खान यांच्यावर हल्ला
अमेरिकेतील इंडियाना स्टेट मॉलमधल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू
१६व्या राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान
इंडोनेशियामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू
दरम्यान, या पावसाळी अधिवेशनात एकूण १८ बैठका होणार असून २४ विधेयकं मांडली जाणार आहेत. पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारने रविवार, १७ जुलै रोजी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी सुमारे २५ मुद्द्यांवर सरकारशी चर्चा करण्याची मागणी केली आहे.