पुलवामा येथील गंगू क्रॉसिंगजवळ सीआरपीएफच्या नाका पार्टीवर आज, १७ जुलैला दुपारी दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे एएसआय विनोद कुमार गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी तात्काळ शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे.
सीआरपीएफच्या जवानांनी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील गंगू क्रॉसिंगजवळ नाका लावला होता. जवळच सफरचंदाच्या बागाही आहेत. तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी अचानक सीआरपीएफ जवानांवर गोळीबार सुरू केला. सीआरपीएफचे जवान हल्ल्यासाठी पोझिशन घेत असताना, या गोळीबारात सीआरपीएफचे एएसआय विनोद कुमार गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. दहशतवादी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. या हल्ल्यानंतर लगेचच पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांनी आजूबाजूच्या भागात शोधमोहीम सुरू केली आहे.
हे ही वाचा:
इंडोनेशियामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू
प्रतीक्षा संपली!! नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्ग ‘या’ तारखेपासून सुसाट
शेलार म्हणाले, ख्वाजा चिस्तीच्या हत्या प्रकरणाची चौकशी करा!
पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात कट रचल्याप्रकरणी पीएफआय सदस्याला अटक
दहशतवादी फार काळ तग धरू शकणार नाहीत, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू झाले आहे, लवकरच त्यांचा शोध घेऊन त्यांच्या खात्मा केला जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.