24 C
Mumbai
Thursday, November 28, 2024
घरराजकारणशिंदे- फडणवीस फेविकॉलचा मजबूत जोड, टुटेगा नही!

शिंदे- फडणवीस फेविकॉलचा मजबूत जोड, टुटेगा नही!

Google News Follow

Related

आपल्यामध्ये मतभेद निर्माण व्हावेत असा विरोधकांचा डाव आहे. परंतु एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस फेविकॉलचा मजबूत जोड आहे. टुटेगा नही, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडमोडींमुळे शिवसेनेतून बंडखोरी केलेले आमदार व भाजपचे आमदार यांच्यात संभ्रम वाढला आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी फेविकॉलच्या जोडचे उदाहरण देऊन आमदारांच्या मनातील गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शनिवारी रात्री शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांच्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित आमदारांना मार्गदर्शन केले.

राज्यात शिंदे सरकार स्थापन होऊन १६ दिवसांचा कालावधी लोटला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेच मंत्रिमंडळ बैठका घेत आहेत. आमदारांचे पुरेसे संख्याबळ असतानाही खाते वाटप झालेले नाही. त्यातच विरोधकही खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तारावरून सातत्याने टीका करत आहेत. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मी जिथे जातो तिथे माझं मंत्रालय सुरु असते, असे सडेतोड उत्तर दिले आहे.

दुसऱ्या बाजुला दररोज आमदारांच्या नव्या पाठिंब्यामुळे शिंदे गटाचे पारडे जड होत आहे. बंडखोर आमदारांकडून दररोज सुरु असलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे अनेक आमदार संभ्रमात असून काहीजण उघडपणे मुख्यमंत्री शिंदेकडे व्यक्त होत आहेत. पंढरपूर आमदारांमध्ये अंतर्गत वाढल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने म्हणाले की, आपल्यात मतभेद करण्याचे अनेक जण प्रयत्न करतील, पण त्याला बळी पडू नका. कमी कालावधीत अधिक चांगले काम करू आणि राज्याला दाखवून देऊ. त्यामुळे काही दिवस स्थिर रहा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात कट रचल्याप्रकरणी पीएफआय सदस्याला अटक

मुंबईतील खड्डे बुजवण्याचे काम २४ तास सुरू ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवारांना दणका; ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती

ठाणे शहराला अतिरिक्त पाण्यासाठी मंजुरी

मतभेदांना बळी पडू नका
माझ्यावर विश्वास ठेवून आलेल्या सगळ्या आमदारांच्या मतदारसंघातील प्रलंबित कामे लवकरच मार्गी लागतील. कुणाला मंत्री केले नाही, म्हणून मतभेद निर्माण केले जातील, त्याला बळी पडू नका, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच आपआपल्या मतदारसंघाकडे लक्ष द्या, अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी सगळ्या आमदारांना दिल्या .

द्रौपदी मुर्मू यांना मताधिक्य द्या
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपाचे एकही मत बाद होणार नाही, याची काळजी घ्या. द्रौपदी मुर्मु मोठ्या मताधिक्याने निवडणून यायला हव्यात, त्यात जास्त मते आपल्या राज्याची त्यांना पडायला हवीत, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्याचे समजते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
200,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा