24 C
Mumbai
Thursday, November 28, 2024
घरक्राईमनामामहाविकास आघाडीच्या काळात राज्यात तब्बल २२ हजार ७५१ बालमृत्यू

महाविकास आघाडीच्या काळात राज्यात तब्बल २२ हजार ७५१ बालमृत्यू

Google News Follow

Related

मागील १७ महिन्यांमध्ये म्हणजेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना २२ हजार ७५१ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे राज्यातील बाल आरोग्याची स्थिती अतिशय चिंताजनक बनली आहे.विशेष म्हणजे अत्याधुनिक रुग्णालये आणि प्रगत आरोग्य यंत्रणा असणाऱ्या मुंबईत शहरातदेखील बालमृत्यूचे प्रमाण वाढत आहे आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे यांच्याकडून समर्थन या संस्थेला माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीतून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. . राज्यात जानेवारी २०२१ ते मे २०२२ या १७ महिन्यात ० ते ५ वर्षे वयोगटातील २२ हजार ७५१ बालमृत्यू झाल्याचे या आकडेवारीत म्हटले आहे.

राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार २२,७५१ बाल मृत्यूपैकी १९,६७३ अर्भकांचे मृत्यू (० ते १ वर्ष) झाले असून, ३,०७८ एवढे १ ते ५ वर्ष वयोगटातील बालकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या आकडेवारीमध्ये मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या प्रगत शहराचादेखील समावेश असून मुंबईत १,३१७ बालमृत्यूंची नोंद झाली असल्याचे म्हटले आहे.

‘समर्थन’ ही संस्था राज्यातील बालकांमधील कुपोषण दूर व्हावे तसेच महिलांचे आरोग्य सुधारावे यासाठी धोरणात्मक पातळीवर कार्यरत आहे. शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या आरोग्यविषयक विविध योजनांचा आढावा सातत्याने घेत असते. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील अर्भक मृत्यू व बाल मृत्यूची स्थितीची माहिती राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे यांच्याकडून मागवण्यात होती.

मागील १७ महिन्यांत सर्वात जास्त बालमृत्यूची नोंद झाली आहे. नंदुरबार व अकोला हे जिल्हे वगळता इतर सर्व जिल्हे हे महाराष्ट्रातील प्रगत जिल्हे आहेत. राज्यातील एकूण बालमृत्यूमध्ये या ९ जिल्ह्यांचे प्रमाण ४३ टक्के इतके मोठे आहे. असे असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर बालमृत्यू का होत आहेत? याचा शासनाने गांभीर्याने अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे. सरकारी यंत्रणा आरोग्याचा दर्जा सुधारावा कुपोषण व बालमृत्यू कमी व्हावेत यासाठी विविध १२ योजना राबविते. मात्र त्याचा सकारात्मक परिणाम होत नसल्याची बाबही ‘समर्थन’ या संस्थेच्या अभ्यासातून निदर्शनास आली आहे.

हे ही वाचा:

इंडिगो विमानाचे कराचीत इमर्जन्सी लँडिंग

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची सिंगापूर ओपनमध्ये बाजी

“संजय राऊतांनी शांततेचा पवित्रा घेऊन शिंदे- ठाकरेंना एकत्र आणावं”

मुंबईतील खड्डे बुजवण्याचे काम २४ तास सुरू ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

सिंधुदूर्ग, वाशिम, लातूरमध्ये कमी प्रमाण

सर्वात कमी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६४, मराठवाड्यातील वाशिम जिल्ह्यात ८९, तर लातूर जिल्ह्यात १२५ बालमृत्यू झाले आहेत. याचाही तुलनात्मक अभ्यास शासनाकडून होणे गरजेचे आहे.

बालमृत्यूची आकडेवारी

मुंबई व मुंबई उपनगर- १ हजार ८९८
नागपूर- १ हजार ७४१
औरंगाबाद- १ हजार ३४९,
नाशिक- १ हजार १२७,
पुणे -१ हजार १८१
अकोला- १ हजार ४९,
नंदुरबार -९ हजार २६
ठाणे- १ हजार १५

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
200,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा