जागतिक बाजारपेठेत सर्व निर्बंधानंतर जी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया दिवसेंदिवस घसरत चाललाय. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकार अनेक योजना आखत आहे यासंदर्भातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतलाय. जगात जो काही व्यापार होतो तो जास्तकरून डॉलरने केला जातो. पण आता आरबीआयने रुपयामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यास परवानगी दिलीय.