चाकरमान्यांचा काेकण प्रवास हाेणार सुखकर
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गणेशाेत्सव साजरा करण्यासाठी मुंबईतून माेठ्या प्रमाणावर चाकरमानी काेकणात जात असतात. परंतु गणेशाेत्सवाच्या सुरुवातीला एसटी महामंडळाच्या बसेसचे आरक्षण फुल झाल्यामुळे अनेकांना अन्य वाहनांनी जाऊन आपले गाव गाठावे लागते. ते खर्चिकही हाेते. हीच गरज लक्षात घेऊन मागील वर्षी चाकरमान्यांना सुविधा म्हणून खास गणेशाेत्सवासाठी ‘माेदी एक्सप्रेस’ पहिल्यांदा धावली हाेती. या गाडीला मिळालेला लक्षणीय प्रतिसाद लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाच्या वतीने या वर्षीही मुंबईतून काेकणात गणेशाेत्सव साजरा करण्यासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खास माेदी एक्सप्रेसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे काेकणकर प्रवाशांना या रेल्वेतून माेफत प्रवास करता येणार आहे.
गणेशाेत्सवासाठी चाकरमानी माेठ्या संख्येने काेकणात जात असतात. काेकणात जाण्यासाठी रेल्वे आणि एसटी महामंडळाकडून विशेष गाड्या देखील काेकणासाठी साेडण्यात येत असतात. दाेन महिने आधीच रेल्वे आणि एसटीच्या आरक्षणाला सुरुवात हाेते. पण या गाड्यांचे आधीच तुडुंब बुकिंग होते. तरीही काेकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची माेठी संख्या असते. नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन गेल्या वर्षी स्पेशल माेदी एक्सप्रेस सुरू करण्यात आली आणि त्याला प्रवाशांकडून लक्षणीय प्रतिसाद मिळाला हाेता.
हे ही वाचा:
रुबैय्या सईदने यासिन मलिकला अपहरणकर्ते म्हणून ओळखले
‘मी जिथे जातो तिथे माझं मंत्रालय सुरु’
मुख्यमंत्री शिंदेंच्या फोननंतर MPSC च्या ४०० जागा वाढणार
गेल्या दाेन वर्षांपासून राज्यात काेराेना महामारीचे संकट हाेते. निर्बंधांमुळे प्रवासावर मर्यादा आल्यामुळे अनेक चाकरमान्यांना आपल्या गणेशाेत्सवाच्या आनंदावर नाईलाजेने विरजण घालावे लागले हाेते. परंतु आता काेराेनाचे संकट असले तरी त्याची दाहकता कमी झाली आहे. प्रवासाचे निर्बंधही शिथील करण्यात आले आहे. त्यामुळे या वर्षी चाकरमानी माेठ्या संख्येने काेकणात जाऊन जाेरदार गणेशाेत्सव साजरा करतील असा अंदाज आहे. त्यामुळे या चाकरमान्यांसाठी मुंबई भाजपने या वर्षीही उपलब्ध करून दिलेली माेदी एक्सप्रेस गाडीची सुविधा फायदेशीर ठरणार आहे. ही एक्स्प्रेस २८ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता दादर रेल्वे स्थानकातून सुटणार आहे. या गाडीचा मार्ग दादर ते सावंतवाडी असा असणार आहे.