31 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरअर्थजगतमहाराष्ट्रात लख्ख 'उजाला'; राज्यात २.२ कोटी एलईडी बल्बचे वितरण

महाराष्ट्रात लख्ख ‘उजाला’; राज्यात २.२ कोटी एलईडी बल्बचे वितरण

Google News Follow

Related

उजाला योजनेत पुणे, नागपूर,  कोल्हापूरची आघाडी

केंद्र सरकारने ऊर्जा बचतीसाठी सुरू केलेल्या उजाला योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने चांगले यश मिळाले आहे. राज्यात आतापर्यंत जवळपास २.२ कोटी एलईडी बल्बचे वितरण झाले आहे. यात पुणे (शहर) परिसराबरोबरच मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विक्रमी एलईडी ट्यूब/बल्ब यांचे वितरण करण्यात आले आहे. याशिवाय औरंगाबाद, अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती या राज्याच्या विविध विभागांमधील शहरांमध्ये प्रत्येकी ८ लाखांपेक्षा जास्त एलईडी ट्यूब/बल्बचे वितरण करण्यात आले आहे. राज्यात वितरित करण्यात आलेल्या एलईडी ट्यूबलाईटची संख्या ५,३१,१३३ एवढी तर एलईडी पंख्यांची संख्या १,८६.२११ एवढी आहे.

उजाला योजनेची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर देशातील एलईडी बल्बच्या किमतीही कमी झाल्या आहेत. यापूर्वी ३००-३५०रुपये किंमतीला असलेला एलईडी बल्ब आता ७०-८० रुपयांमध्ये मिळत आहे. या योजनेंतर्गत एलईडी बल्ब वितरीत करण्यात आल्यामुळे ऊर्जेची वार्षिक बचत झाली आहे, यामुळे राज्यातील अनेक कुटुंबांचे वीज बिल कमी होण्याबरोबरच घर अधिक प्रकाशमान झाले आहे. याशिवाय, व्यस्त वीज मागणी काळात संपूर्ण देशभरात ९,५८५
मेगावॅट इतकी तर महाराष्ट्रात ५७२ मेगावॅट इतकी वीज मागणीत घट झाली. या योजनेमुळे देशातील वार्षिक कार्बन उत्सर्जन ३८. ७७ दशलक्ष टन इतके महाराष्ट्रात २.३ दशलक्ष टन असे लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.

एलईडी ट्यूब/बल्बचे वितरण
पुणे विभाग( शहर)- ३०,४९,३६९
मुंबई विभाग- १०,००,८९४
कोल्हापूर – १२,४८,२७०

महाराष्ट्रात दरवर्षी १,१४० काेटी रुपयांची वीज बचत
या योजनेच्या अंमलबजावणीमुळे देशभरातील वीज बिलांमध्ये अंदाजे १९,००० कोटी रुपयांची आणि महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे १,१४० कोटी रुपयांची बचत झाल्याचा अंदाज आहे.

उजाला- महाराष्ट्रातील जून २०२२ पर्यंतची आकडेवारी
•एलईडी बल्ब वितरण : २,१९,८६,५६९
• एकूण एलईडी पंखे वितरण (जून २०२२) – १,८६,२११
•एलईडी ट्यूबलाईट वितरण (जून २०२२)- ५,३१,१३३
• सर्वोच्च वीज मागणी काळ- ५७२ मेगावॉट इतकी मागणीत घट
• प्रतिवर्ष कार्बन उत्सर्जन कपात –२३,१२,८१७ टन

देशभरात ३६.८६ काेटी एलईडी बल्बचे वितरण
अल्पावधीतसुरू, हा कार्यक्रम जगातील सर्वात मोठा शून्य अनुदानित देशांतर्गत प्रकाश कार्यक्रम म्हणून विकसित झाला आहे. या अंतर्गत ३० जून २०२२ पर्यंत देशभरात ३६. ८६ कोटींपेक्षा जास्त एलईडी बल्बचे वितरण करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

नामांतराच्या निर्णयांना स्थगिती

पंजाबी गायक दलेर मेहंदीला अटक, २ वर्षाचा तुरुंगवास

संसाराचा त्याग करून भगवे झाले जितेंद्र नारायण त्यागी

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा, काँग्रेसला झटका

काय आहे योजना
प्रधानमंत्री ग्रामीण उजाला योजनेंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांना प्रत्येकी १० रुपयांना एलईडी बल्बचे वाटप केले जाते. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला सुमारे तीन ते चार एलईडी बल्ब दिले जातात. सध्या ही योजना देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू आहे.

योजनेला ७ वर्ष पूर्ण
अफोर्डेबल एलईडी फॉर ऑल (उजाला) योजनेद्वारे परवडणाऱ्या किंमतीत उर्जा बचत उपकरणे उपलब्ध करून देणाऱ्या उन्नत ज्योती कार्यक्रमाची सुरुवात 5 जानेवारी २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. देशात या योजनेला आता ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. या योजनेअंतर्गत करोडो लोकांना एलईडी बल्ब मोफत दिले जातात. केंद्र सरकार ही योजना जवळपास प्रत्येक राज्यात राबवते. या योजनेंतर्गत लोकांना पिवळ्या बल्बऐवजी कमी पॉवरचा एलईडी बल्ब वापरण्यास दिला जातो. सध्या ही योजना अनेक राज्यांमध्ये सुरू आहे ज्यात लोकांना १० रुपयांमध्ये एलईडी बल्ब मिळत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा