महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांना पर्यावरण मंत्रीपद मिळालं. मुंबईत अनेक प्रकल्प राबण्यास त्यांनी सुरुवात केली. यादरम्यान महाराष्ट्रात सत्तापालट झाली, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. शिंदे-फडणवीस यांच्या सरकार स्थापनानंतर राज्यात कामाला वेग आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व खर्चिक प्रकल्पांना स्थगिती देण्यात येईल, असे म्हटले आहे.
समुद्राचे खारे पाणी गोडे पाणी करण्याचा प्रकल्प आदित्य ठाकरे यांनी मांडला होता. या प्रकल्पाला तत्कालीन पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी खर्चीक व अनावश्यक प्रकल्प म्हणत गुंडाळला होता. मात्र, आदित्य यांनी या प्रकल्पाचा आग्रह धरला आणि या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. गोराई येथे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी ३ हजार ५२० कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रकल्पातून मिळणाऱ्या प्रति हजार लिटर गोडपाण्यासाठी १६० ते १७० रुपये खर्च येणार असल्याने या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध होत होता. मात्र, आदित्य ठाकरेंनी या प्रकल्पासाठी आग्रह धरून ठेवला होता. परंतु आता देवेंद्र फडणवीस सर्वात प्रथम या खर्चिक प्रकल्पाला स्थगिती देणार असल्याचे सांगितले आहे.
हे ही वाचा:
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान साहित्य मुंबईत दाखल
गुजरात दंगल प्रकरणात सेटलवाड, श्रीकुमार यांच्यानंतर संजीव भट्ट यांना अटक
अश्विनी भिडे यांच्याकडे पुन्हा कुलाबा- वांद्रे मेट्रो ३ चा कार्यभार
मातोश्रीबाहेर मृत्युमुखी पडलेल्या शिवसैनिकाच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री शिंदेंकडून मदतीचा हात
दरम्यान, शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये अनेक खर्चिक प्रकल्पांना स्थगिती मिळण्याची शक्यता आहे. समुद्राचे खारे पाणी गोड करणे, २३ हजार ४४७ कोटी रुपये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प,माहुल पंपिंग स्टेशनसाठी अदलाबदल केलेला भूखंड आणि वरळीतील अनावश्यक प्रकल्प रोखले जातील, असे समजते.