27 C
Mumbai
Saturday, November 30, 2024
घरविशेषराज्यासह मुंबईत पावसाची दमदार हजेरी; वसईत दरड कोसळून दोन जण अडकले

राज्यासह मुंबईत पावसाची दमदार हजेरी; वसईत दरड कोसळून दोन जण अडकले

Google News Follow

Related

राज्यासह मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. उपनगरांत जोरदार पाऊस असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पावसाचा फटका मुंबईत वाहतुकीवर झाला आहे. रस्ते आणि लोकल वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरू असून मध्य रेल्वेची वाहतूक २० मिनिटे अशीराने सुरू आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंड झाल्याची माहिती आहे. वांद्रे, दादर, सायन, अंधेरी येथील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

वसई येथील वाघरळपाडामध्ये एका चाळीतील घरावर आज सकाळी दरड कोसळल्याने दोन जण ढिगार्‍याखाली अडकले आहेत. बचाव कार्य सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या घरात अमित सिंग (४५) पत्नी आणि २ मुलांसह राहत होते. दरम्यान, आज सकाळी साडेसातच्या सुमारास पावसामुळे चाळीवर दरड कोसळली. स्थानिकांच्या मदतीने आई वंदना सिंग (४०) आणि मुलगा ओमसिंग (१२) यांना बाहेर काढण्यात आले. अद्यापही वडील अमित सिंग आणि त्यांची मुलगी रोशनी सिंग (१६) हे ढिगाराखाली अडकले आहेत.

हे ही वाचा:

गुजरात दंगल प्रकरणात सेटलवाड, श्रीकुमार यांच्यानंतर संजीव भट्ट यांना अटक

अश्विनी भिडे यांच्याकडे पुन्हा कुलाबा- वांद्रे मेट्रो ३ चा कार्यभार

मातोश्रीबाहेर मृत्युमुखी पडलेल्या शिवसैनिकाच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री शिंदेंकडून मदतीचा हात

‘सोनिया सेना मग शरद सेना आता रडकी सेना’

राज्यातील सात जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. राज्यातील अनेक अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालघर, पुणे शहर, गडचिरोली या ठिकाणी पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
202,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा