उधार दिलेले पैसे मागितले म्हणून एका तरुणावर अनैसर्गिक लैगिंग अत्याचार करून त्याच्या गुप्तांगाला चटके देण्यात आल्याचा संतापजनक प्रकार मुलुंड पश्चिमेला घडला आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी ३४ वर्षीय इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.
पीडित तरुण हा ३२ वर्षाचा असून मुलुंड पश्चिमेत राहण्यास आहे, पीडित तरुणांकडून आरोपी असणाऱ्या सुरेश म्हस्के नावाच्या व्यक्तीने उधार पैसे घेतले होते. पैसे परत करावे म्हणून पीडित तरुणाने आरोपीकडे सतत तगादा लावला होता. याचा राग आरोपीला आला व त्याने त्याला ६ जुलै रोजी पैसे घेण्यासाठी मुलुंड वसाहत येथील एका बंद गोदामात बोलावून घेतले, त्या ठिकाणी पीडित तरुणाला मारहाण करून त्याच्यावर बळजबरीने अनैसर्गिक लैगिंग अत्याचार करण्यात आला, एवढ्यावर न थांबता या आरोपी सुरेश म्हस्के याने पीडित तरुणांच्या गुप्तांगात पाईप टाकून मेणबत्तीचे चटके दिले, पीडित तरुणाला जखमी अवस्थेत टाकून तेथून आरोपीने पळ काढला.
जखमी अवस्थेत पीडित तरुणाने रुग्णालय गाठले, मात्र त्याची अवस्था बघून तेथील डॉक्टरांनी त्याला सायन रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पीडित तरुणांचा जबाब नोंदवून आरोपी सुरेश म्हस्के याच्या विरुद्ध अनैसर्गिक अत्याचार, मारहाण करणे जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हे ही वाचा:
कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’!
खासदारांच्या दबावानंतर भाजपाच्या उमेदवार मुर्मू यांना शिवसेनेचा पाठींबा
या दोन गाड्या आता पालघरला थांबणार!
गुजरातमध्ये पुराचे थैमान, ६४ लोक दगावले
मुलुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही महिन्यांपासून गुन्ह्याचे प्रमाण वाढत असून चोरी, घरफोड्या, हत्या, दरोडा बलात्कार सारख्या घटनामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.