हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर शिवसेना हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरुन हटवण्यात आलं आहे. संतोष बांगर हे कळमनुरी विधानसभेचे आमदार आणि जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुद्धा होते. मात्र, आता त्यांना जिल्हाप्रमुख पदावरुन हटवण्यात आले आहे.
बहुमत चाचणीच्या आदल्या दिवशीपर्यंत संतोष बांगर हे उद्धव ठाकरेंसोबत होते. ज्यावेळी एकनाथ शिंदेंनी बंड केले आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे इतरही आमदार निघून गेले, त्यावेळी संतोष बांगर ढसाढसा रडले होते. मी बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक म्हणत ते उद्धव ठाकरे यांच्यासाठीही रडले होते. त्या नंतर संतोष बांगर अवघ्या काही तासांत हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याचे दिसून आले. शिवाय आमदार संतोष बांगर बहुमत चाचणीच्या दिवशी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांसोबत बसमध्ये दिसले होते.
हे ही वाचा:
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यात राजकीय भूकंप; काँग्रेसचे १० आमदार भाजपाच्या वाटेवर
‘आरे आंदोलनात आदित्य ठाकरे यांनी लहान मुलांचा वापर केला’
जोकोविचने विम्बल्डन जेतेपदावर सातव्यांदा कोरलं नाव!
१६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवरची सुनावणी पुढे जाणार?
२००९ पासून आमदार संतोष बांगर हे हिंगोलीचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते. आता त्यांना या पदावरुन हटवण्यात आले आहे. त्यानंतर संतोष बांगर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मला काढण्याचा अधिकार कोणालाही नाही. मी शिवसैनिक आहे. मी जिल्हाप्रमुख आहे आणि जिल्हाप्रमुख राहणार. शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे,” असं मत संतोष बांगर यांनी व्यक्त केले आहे. शिवाय भविष्यात ५० जिल्हाप्रमुख खऱ्या शिवसेनेकडे यायला तयार असल्याचा गौप्यस्फोट संतोष बांगर यांनी केला आहे.