मुंबईतून जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटांची तार मध्यप्रदेशच्या एका आश्रमाशी जुळली गेली आहे. मुंबई गुन्हे शाखेने या आश्रमातून २१ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करून एकाला अटक करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणातील मास्टरमाइंड फरार असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.
गुन्हे शाखेच्या सीआययू पथकाने गेल्या महिन्यात मुंबईतील फोर्ट परिसरातून दोघांना बनावट नोटांसह अटक केली होती. या दोघाजवळून मोठ्या प्रमाणात भारतीय चलनातील २ हजाराच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. मोहम्मद अर्शद मोहम्मद सिद्दीकी (४२) लवेश सीताराम तांबे (४१) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून सिद्दीकी हा वाराणशी शहरातील असून तांबे हा ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे राहणारा आहे.
तांबे याच्या चौकशीत धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. या बनावट नोटांचे धागेदोरे मध्यप्रदेशातील एका आश्रमाशी जुळले असल्याची समोर आले. सीआययूचे एक पथक गेल्या आठवड्यात मध्यप्रदेश येथे गेले होते. या पथकांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने धार जिल्ह्यात जंगलात असलेल्या एका आश्रमात छापा टाकून देवदास अटवाल (४५) याला ताब्यात घेऊन आश्रमातील झडतीत २१ लाख रुपये किमतीचे बनावट नोटा सापडल्या. या गुन्हयातील मास्टरमाइंड मात्र सापडला नाही.
हे ही वाचा:
उद्धवजी, मुर्मूना पाठिंबा द्या! खासदार राहुल शेवाळे यांचा लेटरबॉम्ब
नुपूर शर्मांचे शीर कापणाऱ्यास घर देण्याची भाषा; अजमेर शरीफच्या सलमानला अद्याप अटक नाही
शिवसेनेत किती संतोष बांगर उरलेत???
‘आज्ञेचे पालन म्हणून, उपमुख्यमंत्री झालो’
पोलिसांनी जप्त केलेल्या बनावट नोटा उच्च दर्जाच्या असून या नोटा देशभरात वितरित करण्यात येत होत्या अशी माहिती समोर येत आहे. आश्रमातून अटक करण्यात आलेल्या अटवाल याला मुंबईत आणण्यात आले असून मुंबईतील किल्ला न्यायालयात त्याला हजर करण्यात आले असता न्यायालयाने ६ जुलै पर्यत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.