24 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषमुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी; रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटका

मुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी; रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटका

Google News Follow

Related

मुंबईसह उपनगरात पावसाने रात्रीपासून दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले असून काही ठिकाणी पावसाचा वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र आहे. रस्ते वाहतूक मंदावली असून पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. मुंबईला हवामान विभागाने रेन अलर्ट दिला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबईत सोमवार, ४ जुलैपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आज ५ जुलै रोजीही पावसाचा जोर कायम आहे. मुंबईतील विलेपार्ले, हिंद माता, अंधेरी सबवे, वांद्रे, कुर्ला आदी भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतूक मंदावली आहे. तर उपनगरीय लोकल सेवेला या पावसाचा फटका बसला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे विलंबाने सुरू आहे. पावसाच्या हजेरीमुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

हे ही वाचा:

शिकागोमधल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री शिंदे ऍक्शन मोडमध्ये; पेट्रोलवरचा व्हॅट कमी करण्याची घोषणा

आदित्य ठाकरेंना वगळून शिवसेनेच्या १४ आमदारांना व्हीपचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस

पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरच्या दिशेने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोडले काळे फुगे

मुंबईबरोबरच नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, विरार, पालघर या शहरांमध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कोकणातही पावसाने हजेरी लावली असून खेड तालुक्यातील जगबुडीनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जगबुडी नदीची धोक्याची पातळी सात मीटर आहे, नदीपात्रातील पाणी आता आठ मीटरपर्यंत पोहोचले आहे. त्यानंतर राजापूर तालुक्यातील कादवली नदीने इशाऱ्याची पातळी पार केली आहे. तर चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठी नदी, संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदी पावसाचा असाच जोर राहिला तर धोक्याची पातळी ओलांडतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा