भारतीय सैन्याच्या चिनार दलाने पुण्यातील एका संस्थेशी सामंजस्य करार (मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग) केला आहे. पुण्यातील इंद्राणी बलान फाऊंडेशन या संस्थेशी झालेल्या करारानुसार ही संघटना काश्मिर खोऱ्यातल्या मुलांसाठी शाळा चालू करायला सैन्याला सहाय्य करणार आहे.
हे ही वाचा:
या करारान्वये इंद्राणी बलान संस्थेकडून ‘आर्मी गुडविल स्कुल्स’ आणि परिवार स्कुल सोसायटीसाठी अर्थसहाय्य करणार आहे.
याबाबतचा कार्यक्रम चिनार कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल बीएस राजू यांच्यासोबत इंद्राणी बलान फाऊंडेशनचे पुनीत बलान आणि जान्हवी धारिवाल यांच्या उपस्थितीत पार पडला.
एनएयला दिलेल्या माहितीत लेफ्टनंट जनरल राजू म्हणाले, की आमच्यासाठी हा महत्त्वाचा दिवस आहे. इंद्राणी बलान फाऊंडेशनकडून आर्मी गुडविल स्कुल आणि परिवार स्कुलसाठी अर्थसहाय्य केले जाणार आहे. आही इंद्राणी बलान फाऊंडेशनचे आभार मानतो, की त्यांनी यासाठी पुढाकार घेतला. काश्मिर मधल्या मुलांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी त्यांनी भारतीय सैन्याशी हातमिळवणी केली, ही अतिशय महत्त्वाची घटना आहे.
इंद्राणी बलान फाऊंडेशनचे विश्वस्त पुनीत बलान यांनी देखील त्यांच्या संस्थेसाठी हा मैलाचा दगड असल्याचे सांगितले.
चिनार कॉर्प्स काश्मिरमध्ये सध्या २८ गुडविल स्कुल्स चालवत असून आत्तापर्यंत दहा हजारपेक्षा अधिक विद्यार्थी दरवर्षी या शाळांत शिक्षण घेतात. आत्तापर्यंत सुमारे एक लाखापेक्षा अधिक विद्यार्थी या शाळांतून उत्तीर्ण झाले आहेत.