32 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरराजकारणविधानसभेत एकनाथ शिंदे यांची तुफान बॅटिंग; भाषणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

विधानसभेत एकनाथ शिंदे यांची तुफान बॅटिंग; भाषणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Google News Follow

Related

सोमवारी विधान सभेत भाजपा शिवसेना युतीने बहुमत चाचणीत १६४ मते मिळविल्यानंतर दिवस गाजवला तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. त्यांचे भाषण हा या दिवसातील परमोच्चबिंदू होता. एरवी शांत, संयमी असलेले एकनाथ शिंदे सभागृहातील भाषणात मात्र मनमोकळेपणाने आणि मनापासून बोलले. त्यामुळे विधानसभेत उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांमध्ये हास्याची लकेर उमटली. त्यातून विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील यांचीही सुटका झाली नाही. एकनाथ शिंदे यांच्या भाषणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. या भाषणातील छोटे छोटे प्रसंग सोशल मीडियावर गाजले.

आपण आतून बोलत आहोत, यात लपविण्यासारखे काही नाही, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. त्यात त्यांचे भावनिक भाष्य होतेच पण राजकीय भाष्य करतानाही त्यांनी अनेकांना चिमटे घेतले, कोपरखळ्या मारल्या, पण या भाषणात त्यांनी कुणावरही वर्मी लागणारे घाव घातले नाहीत किंवा बोचरी टीकाही केली नाही.

आपल्या राजकारणाचा भूतकाळ उलगडून सांगताना धर्मवीर आनंद दिघे यांची आपल्याला वेळोवेळी कशी साथ लाभली. कौटुंबिक अडचणीत दिघे यांनी आपल्याला कसा आधार दिला. आपल्याला कसे सावरले असे सांगतानाच शिंदे यांनी नंतर सर्वसामान्यांसाठी आपण कसे झटलो, त्यांच्यासाठी कसे जीवाचे रान केले, शिवसेनेचा बाळासाहेब ठाकरेंचा विचार कसा पुढे नेला याचे वर्णन केले पण त्यापेक्षाही त्यांच्या कोपरखळ्यांनी विधानसभेतील वातावरण हलकेफुलके केले.

छगन भुजबळ हे कसे वेष बदलून बेळगावला गेले होते नंतर आपणही शिवसैनिकांसोबत तिथे गेलो पण कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले, ४० दिवस तुरुंगात राहिलो अशा आठवणी सांगताना भुजबळांमुळेच आपल्याला तुरुंगात दिवस काढावे लागले असे मिश्किलपणे म्हणाल्यावर भुजबळही हसू लागले. राज्यसभेत आपण दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी ‘फुल्ल फिल्डिंग’ लावल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले पण आपला एक उमेदवार पडला. दुसरा पडायला हवा होता, अशी अनेकांची भावना असल्याचे त्यांनी सांगितले आणि सभागृहात हशा पिकला.

बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार सूरतमार्गे गुवाहाटीला गेले. तेथे गेल्यानंतर फडणवीसांशी आपली कशी भेट व्हायची हे त्यांनी सांगितले आणि फडणवीसांनीही मग जास्त उघड करू नका असे म्हणत हसत हसत हात जोडले. एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही कधी भेटायचो ? सारे आमदार झोपले की मी फडणवीसांना भेटायचो आणि आमदार उठण्याच्या आत परत जायचो!

हे ही वाचा:

शिवसेना वाचविण्यासाठी शहीद झालो तरी चालेल पण आता माघार नाही!

कोकणपट्ट्यात पावसाने जोर पकडला, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या

अजित पवार यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड

हिमाचलमध्ये बस दरीत कोसळून १६ प्रवाशांचा मृत्यू

 

गटार, रेडे, बळी, प्रेतं असे शब्द आमच्याबद्दल वापरले. गुवाहाटीतील कामाख्या देवीला ४० रेड्यांचा बळी दिला जाईल, अशी भाषा वापरली गेली. पण कामाख्या देवीने बोलणारा रेडा मला नको, असे सांगितले, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

भाजपाचे १०६ आमदार असताना एकनाथ शिंदे यांना कसे काय मुख्यमंत्री पद दिले, असे सवाल अनेक जण उपस्थित करतात, त्याबद्दल एकनाथ शिंदे म्हणाले की, तुम्ही दोन्ही काँग्रेस मिळून १००चे संख्याबळ होते पण तरीही तुम्ही उद्धव ठाकरे यांना कसे काय मुख्यमंत्रीपद दिले. त्यावरूनही सभागृह दणाणून गेले. एकनाथ शिंदे म्हणाले की, भाजपाचे ११५ आमदार आहेत आपण ५० आहोत त्यामुळे १६५ चे संख्याबळ आता आहे पण निवडणुकीत आपण २०० जण निवडून आणू.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा