उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली तारीफ
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत नेहमीच सर्वसामान्य लोकांसाठी स्वतःला वाहून घेतले. २४ तास कार्यरत राहणारा हा नेता असून लहानातल्या लहान कार्यकर्त्याला भेटून त्याच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न ते करतात. प्रचंड माणुसकी असलेला हा नेता आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
प्रारंभी भाजपा शिवसेना युतीला विश्वासदर्शक ठरावात जिंकून देणाऱ्या अदृश्य हातांचे त्यांनी आभार मानले. नंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या क्रमाक्रमाने वृद्धिंगत होत गेलेल्या कारकीर्दीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेनाप्रमुख यांच्या विचारांचे पाईक. कर्मावर अढळ निष्ठा. असे व्यक्तिमत्त्व. कुशल संघटक. जनतेचे सेवेकरी. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे या दोघांच्या प्रभावामुळे ८०च्या दशकात शिंदे यांनी सक्रीय काम सुरू केले. कार्यकर्ता शाखाप्रमुख वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सूत्रे हाती घेतली आहेत.
फडणवीस यांनी सांगितले की, धर्मवीर आनंद दिघे यांनी १९८४ला किसननगर शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. नंतर दिघेंच्या नेतृत्वात अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आंदोलने हाती घेतली. छोट्या छोट्या विषयासाठी आंदोलने केली. सलग चार वेळा विधानसभेत निवडून आले. माझ्यासोबत मंत्रीही होते. तर त्या काळात सीमाप्रश्नावर आक्रमक आंदोलनात नेता म्हणून दबदबा तयार केला.
१९९७मध्ये नगरसेवक, मनपा सभागृह नेते. आमदार, जिल्हाप्रमुख शिवसेना झाले. २०१४मध्ये मी मुख्यमंत्री झालो. अल्प काळासाठी ते विरोधी पक्षनेता होते. पुन्हा आम्ही एकत्र आलो. एमएसआरडीसीचे मंत्री म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला. काहींना वाटायचे त्यांचे पंख छाटले, पण ज्यांच्यात कर्तृत्व असते त्यांना पद महत्त्वाचे नसते. जे मिळेल त्यातून विश्व निर्माण करतो. समृद्धी महामार्गाची संकल्पना मी मांडली त्यांच्याशी चर्चा केली. आम्ही प्लॅन तयार केला ९ महिन्यात जमिनी घेतल्या. प्रत्यक्ष मैदानात जाऊन समस्या सोडविल्या, कामातील अडथळे दूर केले, सातत्याने कामाकडे लक्ष दिले त्यांचे नाव एकनाथ शिंदे. पायाला भिंगरी लावून काम केले. आरोग्य विषयासाठी झोकून दिले. स्वतः जाऊन त्यांनी व्यवस्था उभ्या केल्या. डॉक्टरांच्या नियुक्त्या वेगाने व्हायला हव्यात असे काम केले, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांच्या कर्तृत्वाची ओळख फडणवीस यांनी करून दिली.
फडणवीस यांनी सांगितले की, एकनाथराव वेगळे रसायन आहे. तुम्ही झोपता कधी जेवता कधी २४ बाय ७ काम करतो. हा नेता. निवडणूक असते तेव्हा ७२ बाय २१ असे तीन दिवस ते काम करतात. पदे मिळाल्यावर एखाद्याचा भाव हरवतो पण एकनाथ शिंदे यांच्यात प्रचंड माणुसकी आहे. लहानात लहान माणसाला मदत देतात. ज्याच्या कुणी नाही त्यांना मदत करण्याचे काम करतात.
हे ही वाचा:
डेन्मार्कमधील मॉलमध्ये गोळीबार; तिघांचा मृत्यू
शिंदे फडणवीस सरकारने बहुमत चाचणी १६४ मतांनी जिंकली
संतोष बांगर एकनाथ शिंदेंसोबत विधानसभेत रवाना
उद्धव ठाकरेंना धक्का; गटनेते एकनाथ शिंदे, प्रतोद म्हणून भरत गोगावलेंना मान्यता
आमच्या सरकार काळात आदिवासींचा मोर्चा आला होता तेव्हा गिरीश महाजन सामोरे गेले होते. पण त्यांची व्यवस्था, नाशिकच्या मोर्चाची व्यवस्था एकनाथरावांनी केली. मग गिरीशभाऊंनी त्यांचे म्हणणे एकले. सरकार संवेदनशील असले पाहिजे. आंदोलन करत आहेत म्हणून एकही शब्द ऐकून घेणार नाही, काहीही बोललात उचलू आणि जेलमध्ये टाकू ही अवस्था पाहायला मिळाली ती चांगली नाही.
लोकशाहीत दुसरा आवाज आहे पटो किंवा न पटो तो ऐकला पाहिजे. त्यावर प्रत्युत्तरही द्या. महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली तेव्हा एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण तिथे गेले. बोटीत साप शिरत असतानाही त्यांनी लोकांना मदत केली. आजही ५०० लोकांना ते भेटतात. मी त्यांना म्हटले की, मुख्यमंत्र्यांना वेळ पाळावी लागेल. पब्लिक दिसले की ते रमतात. त्यांच्या समस्या सोडविल्याशिवाय बाहेर पडत नाहीत. पण त्यांना ते समजावले. मात्र यशस्वी मुख्यमंत्री म्हणून काम करतील. छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला भेटतात. त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होता. शांतचित्ताने ते बसतात. या पेशन्समुळे जडणघडण झाली आहे त्यांची. साताऱ्याचा जन्म आहे त्यांचा , ठाणे ही त्यांची कर्मभूमी. वैयक्तिक जीवनात अनेक वाईट घटना घडल्या पण धर्मवीर दिघे यांनी त्यांना ऊर्जा दिली, प्रेम दिले तिथून त्यांच्यातील खरे नेतृत्व उभे केले, असेही फडणवीस म्हणाले.