डेन्मार्कमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. कोपनहेगन येथील एका मॉलमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून एकाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
कोपनहेगन येथील एका मॉलमध्ये गोळीबार सुरू होताच घाबरून लोकं धावत सुटले तर काहींनी लपण्यासाठी जागा शोधली. गोळ्यांचा खूप मोठा आवाज आल्याचं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. घटनास्थळावरून २२ वर्षीय तरुणाला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. त्यानुसार तीन ते चार गोळ्या झाडण्यात आल्या. हा हल्ला चिंताजनक असून ही अत्यंत गंभीर बाब आहे, असं महापौर सोफी हेस्टोर्प अँडरसन यांनी म्हटलं.
#UPDATE | Several people were killed in a shooting at a shopping centre in Denmark's Copenhagen, Danish police said, adding they had arrested a 22-year-old Danish man and could not rule out it was an "act of terrorism": Reuters
— ANI (@ANI) July 3, 2022
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंना धक्का; गटनेते एकनाथ शिंदे, प्रतोद म्हणून भरत गोगावलेंना मान्यता
माजी पोलिस आयुक्त संजय पांडेंना ईडीचे समन्स
शिवसेनेकडून आढळराव पाटलांची हकालपट्टी नंतर माघार
गोळीबारानंतर घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमी रुग्णांवर उपचार असून असून जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मृतांमध्ये एक ४० वर्षाची व्यक्ती होती तर इतर दोन तरुणांबद्दल माहिती मिळालेली नाही. हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून या घटनेचा तपास सुरू आहे.