27 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरराजकारणउद्धव ठाकरेंना धक्का; गटनेते एकनाथ शिंदे, प्रतोद म्हणून भरत गोगावलेंना मान्यता

उद्धव ठाकरेंना धक्का; गटनेते एकनाथ शिंदे, प्रतोद म्हणून भरत गोगावलेंना मान्यता

Google News Follow

Related

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसल्यावर उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेनेचे अजय चौधरी यांची गटनेता म्हणून मान्यता रद्द करण्यात आली असून एकनाथ शिंदे हेच गटनेता असणार आहेत. तर भरत गोगावले यांना प्रतोद म्हणून मान्यता मिळाल्याचे पत्र विधीमंडळाने मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

शिवसेनेच्या वतीने अजय चौधरी यांना गटनेता म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तसेच सुनिल प्रभू यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच गटनेता असतील आणि भरत गोगावले हे प्रतोद पदावर असतील, असं पत्र विधानमंडळ सचिवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांना पाठवले आहे.

विधानपरिषद निवडणुक निकालानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं होतं. त्यानंतर शिवसेनेचे तब्बल ३९ आमदार फोडल्यानंतर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेतेपदावरून काढण्यात आले होते आणि अजय चौधरी यांना गटनेते करण्यात आलं होतं. तसेच विधिमंडळाच्या मुख्य प्रतोदपदी सुनील प्रभू यांची निवड करण्यात आली होती.

हे ही वाचा:

माजी पोलिस आयुक्त संजय पांडेंना ईडीचे समन्स

शिवसेनेकडून आढळराव पाटलांची हकालपट्टी नंतर माघार

सामाजिक संदेश देणारा ‘व्हॅलिअंट फेम आयकॉन ऑफ महाराष्ट्र २०२२’ शो

शिवसेना चित्रपट सेनेला खिंडार; उपाध्यक्ष दिगंबर नाईक भाजपच्या वाटेवर?

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २१ जून रोजी एकनाथ शिंदे यांचं गटनेतेपद काढून घेतलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती. शिवसेनेनं त्यांच्या सर्व आमदारांना पक्षाच्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आदेश मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या सहीनं दिले होते. एकनाथ शिंदे यांनी सुनील प्रभू यांचं नोटीस कायदेशीर दृष्ट्या अवैध असल्याचं म्हटलं होतं. मात्र, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी प्रतोद नियुक्तीचा अधिकार हा पक्षप्रमुखांना असल्याचं म्हटलं होतं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा