नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद देशभरच नव्हे तर परदेशातही उमटले होते. नुपूर शर्मा यांना समर्थन देणाऱ्यांची हत्या झाल्याची देशात दुसरी घटना घडली आहे.अमरावतीतील उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मा मुद्यावरूनच झाली असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ७ आरोपींना अटक केली आहे. हत्ये प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला युसूफ खान हा उमेश कोल्हे यांचाच मित्रच असल्याचे आता स्पष्ट झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. मात्र त्याचा हत्येत सहभाग असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
उमेश कोल्हे यांचा पोस्टमॉर्टेमचा अहवाल समोर आला आहे. चाकू हल्ल्यामुळे उमेश यांच्या मेंदूला इजा झाल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. याशिवाय त्यांच्या श्वासोच्छवासाची नळी, अन्नाची नळी आणि डोळ्याच्या नसांनाही चाकूने इजा झाली होती. त्यांच्या मानेवरची जखम पाच इंच रुंद आणि सात इंच लांब होती, असे पोस्टमॉर्टम अहवालात स्पष्ट आले आहे. आधी उमेश कोल्हे यांची हत्या दरोड्यातून झालेली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. पण नंतर नुपूर शर्मा यांना दिलेल्या समर्थनातून ही हत्या झाल्याचे समोर आले.
हे ही वाचा:
माजी पोलिस आयुक्त संजय पांडेंना ईडीचे समन्स
शिवसेनेकडून आढळराव पाटलांची हकालपट्टी नंतर माघार
सामाजिक संदेश देणारा ‘व्हॅलिअंट फेम आयकॉन ऑफ महाराष्ट्र २०२२’ शो
शिवसेना चित्रपट सेनेला खिंडार; उपाध्यक्ष दिगंबर नाईक भाजपच्या वाटेवर?
उमेश यांच्या हत्येमागे त्यांचा मित्र युसूफ खानचा सहभाग असल्याचे म्हटले जात आहे. कारण उमेश यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ व्हाट्सअँपला पाठवलेली पोस्ट ही एका मुस्लिम सदस्यांच्या ग्रुपमध्ये पाठवलेली. ज्यामध्ये त्यांचा मित्र युसूफ होता. युसुफने त्यांची ती पोस्ट दुसऱ्या ग्रुपमध्ये पाठवली ज्यामध्ये उमेश यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार इरफान खान हा होता. त्यामुळे या प्रकरणाची आणखी चौकशी सुरु आहे. राजस्थानमधील उदयपूरमध्ये कन्हैयालाल या शिंपीच्या हत्येच्या आठवडाभर आधी ही घटना घडली होती.