25 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरराजकारणशिवसेना चित्रपट सेनेला खिंडार; उपाध्यक्ष दिगंबर नाईक भाजपच्या वाटेवर?

शिवसेना चित्रपट सेनेला खिंडार; उपाध्यक्ष दिगंबर नाईक भाजपच्या वाटेवर?

Google News Follow

Related

शिवसेनेला एक मागून एक धक्के बसत आहेत. शिवसेना नेते,एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ३९ आमदार वेगळे झाल्यानंतर आता चित्रपट सेनेतही बंडाळी माजली आहे का अशी शंका घ्यायला वाव आहे. आता रा स्व संघाच्या तालमीत तयार झालेले पण गेली १० वर्षे शिवसेनेचा स्टार प्रचारक, मालवणी सम्राट, ललित नाट्य ट्रस्टचे विश्वस्त असलेले ज्यांनी ग्रामीण भागात एकटे फिरून शिवसेनेचा प्रचार केला ते नाट्य, सिनेमा अभिनेते,चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष दिगंबर नाईक सुद्धा नाराज असल्याने भाजपाच्या वाटेवर असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

शिवसेनेत बंड काही नवे नसले तरी सध्या शिवसेना पक्षावरच दावा कोणाचा ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. ३९ आमदार नंतर काही खासदार सुद्धा भाजपा सोबत युती व्हावी यासाठी पक्षप्रमुखकडे आग्रह करत आहेत. कारण भविष्यात निवडणुका लढवताना युती आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा:

विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर यांची प्रचंड बहुमताने निवड; राजन साळवींना फक्त १०७ मते

‘पारदर्शक पद्धतीने आम्ही राज्याचा कारभार चालवणार’

राहुल नार्वेकरांच्या पाठीशी राजकारणाचा वारसा

पंतप्रधान मोदी ७ जुलैला वाराणसी दौऱ्यावर

 

अलीकडेच एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर चित्रपट अभिनेते शरद पोंक्षे यांनी त्यांच्या आजारपणात केलेल्या मदतीबद्दल शिंदे यांच्याबद्दल पोस्ट केली होती, यामुळे शरद पोंक्षे यांच्या बद्दल चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी केलेलं विधान चर्चेत असताना लगेच चित्रपट सेनेतील वरळी विभागात राहणारे अमोल परब यांनी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून बांदेकर यांच्या विरोधात बंड पुकारून राजीनामा दिला आहे.

ही बातमी ताजी असताना मालवणी सम्राट,चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष दिगंबर नाईक सुद्धा नाराज असल्याचे समजत आहे. दिगंबर नाईक हे नेहमीच सोशल मीडिया सक्रिय असलेले,नेहमीच कोकणातील दशावतार कलाकार जगला पाहिजे,त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून मागे त्यांनी राज्यपाल महोदय यांची सुद्धा भेट घेतली होती. चित्रपट सेनेतून न्याय मिळत नसल्याची खंत मागे व्यक्त केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा बांदेकर यांच्या सुचनाकडे बघत असतात.पण आमच्याकडे बघायला त्यांना वेळ नसल्याने ते सध्या भाजपच्या वाटेवर असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा