राहुल नार्वेकर यांची विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली असून त्यामुळे गेले वर्षभर विधानसभा अध्यक्षपदाचा निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. राहुल नार्वेकर हे महाराष्ट्रातील राजकारणात एक सुपरिचित असा चेहरा आहेत. वयाच्या अवघ्या ४५व्यावर्षी त्यांच्याकडे राज्याच्या या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी आली आहे.
राहुल नार्वेकर हे याआधी शिवसेनेचे प्रवक्ते होते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलेले आहे. राहुल नार्वेकर हे शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रवक्ताही होते. ते स्वतः एका राजकारणाशी संबंधित परिवाराचे सदस्य आहेत. २०१९ला ते भारतीय जनता पार्टीत आले. २०१९ला ते कुलाबा मतदारसंघातून विजयी झाले. त्यांचे वडील सुरेश नार्वेकर हे नगरसेवक होते. राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर हे कुलाब्यातील २२७ प्रभागाचे नगरसेवक आहेत. राहुल नार्वेकर यांच्या वहिनी हर्षिता नार्वेकर या २२६ प्रभागाच्या नगरसेविका आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आताच विधान परिषद निवडणुकीत निवडून आलेले रामराजे निंबाळकर यांचे ते जावई आहेत. त्यामुळे सासरे आणि जावई हे विरोधी पक्षात असल्याचेही हे एक वेगळे उदाहरण आहे.
हे ही वाचा:
‘पारदर्शक पद्धतीने आम्ही राज्याचा कारभार चालवणार’
पंतप्रधान मोदी ७ जुलैला वाराणसी दौऱ्यावर
विधानभवनातील शिवसेना कार्यालय सील
अमरावती हत्या प्रकरणातील सूत्रधार इरफान खान जेरबंद
विधानसभा अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची घोषणा भाजपाने केल्यानंतर रविवारी झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना १६४ मते पडली तर त्यांच्या विरोधात असलेल्या राजन साळवी यांना १०७ मते पडली. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक असलेल्या १४५ मतांपेक्षा त्यांना १९ मते जास्त पडली.